राम देवसरकरांचे कार्य काँग्रेस कमिटिला बळ देणारे -मा.ना.अशोकराव चव्हाण.
राम देवसरकरांचे कार्य काँग्रेस कमिटीला बळ
देणारे – मा.ना.अशोकराव चव्हाण
१२.४५ कोटी रुपयांच्या विकास कामाचे भूमिपूजन व लोकनेते स्व.अनंतराव देवसरकर स्मृतिप्रित्यर्थ रुग्णवाहिकेचे लोकार्पण
उमरखेड :
जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम सभापती राम देवसरकर त्यांच्या प्रयत्नातुन जिल्हा परिषद विडुळ मतदारसंघांमध्ये विविध १२.४५ कोटी रुपयांच्या विकास कामांचे भुमिपुजन व लोकनेते स्व.अनंतराव देवसरकर स्मृतिप्रित्यर्थ रुग्णवाहिकेचे लोकार्पण महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते शिवकमल मंगल कार्यालय येथे करण्यात आले.यावेळी राम देवसरकर कार्य काँग्रेस कमिटीला एकत्रीत बळ
देणारे आहे असे मा.ना.अशोकराव चव्हाण यांनी प्रतिपालन केले.
लोकार्पण व भूमिपूजन सोहळा या कार्यक्रमाचे अध्यक्ष यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष आ.डॉ.वजाहात मिर्झा हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र प्रदेश कॉग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष आ.अमर राजुरकर,माजी खासदार सुभाषराव वानखेडे, महाराष्ट्र प्रदेश कॉग्रेस कमिटीचे सरचिटणीस तातु देशमुख,उमरखेड महागाव मतदारसंघाचे मा.आ.विजयराव खडसे,महिला काँग्रेस कमिटीच्या जिल्हाध्यक्षा वनमालाताई राठोड, काँग्रेस युवकचे नेते जितेंन्द्र मोघे हे होते. यावेेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बाळासाहेब चंद्रे, आपला जनतेचे अध्यक्ष आनंदराव कदम,उमरखेड काँग्रेस कमिटीचेे तालुकाध्यक्ष तालुकाध्यक्ष दत्तराव शिंदे, महागाव काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष शिवाजीराव सवनेेकर, काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष नंदकिशोर अग्रवाल,कॉग्रेसचे नेते गोपाल अग्रवाल, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश चव्हाण,विविध सहकारी संस्थांचे पदाधिकारी, विविध स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी,काँग्रेसचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
ते पुढे बोलताना म्हणाले की,उमरखेड तालुक्यांमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत अति तात्काळ असलेल्या विकास कामाकरिता कमीत कमी 50 कोटी रुपये देण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. यासोबतच युपीपी अंतर्गत अपूर्ण राहिलेली कालव्याची कामे पूर्ण करण्याकरिता पाठपुरावा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. सोबतच शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान भरून येण्याकरिता पिक विमा कंपन्याकडे पाठपुरावा करून शासनाकडून जास्तीत जास्त निधी मिळवून देण्याचा प्रयत्न करणार असे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा परिषदचे अर्थ
व बांधकाम सभापती राम देवसरकर यांनी प्रास्ताविक केले. यावेळी त्यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांच्याकडे उमरखेड महागांव मतदारसंघामधिल शेतकऱ्यांना नांदेड जिल्ह्यामधिल ज्याप्रमाणे पिकविमा मिळाला त्याप्रमाणे पिकविमा मिळावा यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी केली यासोबतच परभणी येथिल अचुक हवामानाचा अंदाज सांगणारे पंजाबराव डक पाटिल यांना शासकिय सेवेची संधी देण्याची मागणी केली याशिवाय जिल्हयामधिल जवळपास ५ हजार किमी मधिल अतिवृष्टीमुळे ३०० कि मी रस्ते वाहुन गेले आहेत त्यामुळे जिल्हयामध्ये मोठ्या प्रमाणात निधी देण्याची यावेळी मागणी केली.यावेळी तातु देशमुख ,मा.आ.विजय खडसे,मा.खा.सुभाषराव वानखेडे,आ.वजाहत मिर्झा यांनी आपले मत व्यक्त केले. माजी खासदार सुभाषराव वानखेडे यांनी पैनगंगा नदीवर पूल कम बंधारा जागोजागी बांधण्यात यावे अशी मागणी केली.
महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण उमरखेड मध्ये पहिल्यांदाच आल्यामुळे उमरखेड महागाव विधानसभा मतदारसंघांमधिल काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. कार्यक्रमाचेे सूत्रसंचालन व आभार देवराये सर यांनी मानले. यावेळी या कार्यक्रमाला विडुळ जिल्हा परिषद मतदारसंघातील व तालुक्यातील हजारो नागरिक उपस्थित होते.
लोकनेते स्व.अनंतराव देवसरकर यांच्या आठवणीला उजाळा
राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. शंकरराव चव्हाण व स्व.अनंतराव देवसरकर यांचे असलेले संबंध व स्व.अनंतराव देवसरकर यांचा तालुक्यात विकास कामे झाली पाहिजे व तालुका सुजलाम सुफलाम व्हायला पाहिजे याकरिता त्यांनी स्व.शंकरराव चव्हाण यांच्याकडे अनेकदा पाठपुरावा केला असल्याची आठवण दिली.