अतिपावसाने सोयाबीनचे नुकसान व फुटले कोंब – शेतकरी आर्थिक संकटात.
अतिपावसाने सोयाबीनचे नुकसान व फुटले कोंब शेतकरी आर्थिक संकटात.
पंचनामे करून प्रशासनाने शेतकऱ्यांच्या मालाची नुकसान भरपाईची दयावी मागणी.
उमरखेड….
दि.25_सप्टें
उमरखेड तालुक्यात सतत पडत असलेल्या अतिवृष्टीमुळे,कोप्रा(बु),बोरी, चातारी,ब्राम्हणगाव,सिंदगी,कृष्णापूर,सावळेस्वर,गांजेगाव,ह्या परिसरात ऐन सोयाबीन काढणीवरच अतिवृष्टीने घात केल्याने हातातोंडाशी आलेला घास, ‘शेतकरी बांधवांचा’ हिरावून घेतला. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले.
शेतकऱ्यांनी शेतात सोयाबीन काढून,ढग मारून ठेवले होते,पण अवकाळी पावसामुळे तसेच सततच्या रिमझिम पावसामुळे सोयाबीनला मोठया प्रमाणात कोंब फुटत आहे,व काळे पडत आहे.कपाशी व तुर यांना पण जोरदार फटका बसलेला आहे.सोबत बोन्डअळी देखील शेतकऱ्यांच्या चिंतेत भर घालत आहे.
त्यामुळे दरवर्षी पेक्ष्या या वर्षी भाव पडेल मिळेल काय? अशी भीती शेतकरी बांधवा मध्ये पसरली आहे.
अशा अनेक संकटांनी तालुक्यातील शेतकरी बांधव, विवंचनेने मध्ये आहे. तसेच शेतकऱ्यांना पीक विमा किती मिळेल, अशी शाश्वती सांगता येत नाही.त्यामुळे शेतकऱ्यांना लवकरात लवकर शासनाकडून आर्थिक मदत देऊन दिलासा मिळावा,अशी मागणी प्रतिनीधी च्या माध्यमातून केली ,गणेश बापुराव कदम,शंकर सखाराम माने(कोप्रा,बु) धनंजय प्रल्हाद माने,दत्ता मुगाजी वानखेडे,
संतोष आत्माराम माने,(बोरी)
साहेबराव माने(बोरी)
दत्ता मुगाजी वानखेडे,
संतोष आत्माराम माने,(बोरी)
साहेबराव माने(बोरी)व परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.
Your point of view caught my eye and was very interesting. Thanks. I have a question for you.