यशवंत माध्यमिक विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांनी दिवाळीच्या सणाचे औचित्य साधून केली स्नेह भेटीचे नियोजन.
यशवंत मा. वि. माजी विद्यार्थ्यांनी दिवाळीच्या सनाचे औचित्य साधून केले स्नेह भेटीचे नियोजन*
बोरगाव अर्ज फुलंब्री…
ता.फुलंब्री जि.औरंगाबाद येथील यशवंत माध्यमिक विद्यालयातील सण 2010 च्या 10 वी च्या बॅच चे माजी विद्यार्थी तब्बल अकरा वर्षांनी एकत्र जमले.शाळेच्या प्रांगणात जुण्या बालपणीच्या खोडकर आठवणींना उजाळा देत शाळेच्या आवारात एकमेकांबरोबर गप्पा मस्करी केली.
यशवंत विद्यालय बोरगाव अर्ज
शाळेच्या जुण्या बाकावरही बसण्याचा आनंद घेतला काही जणांनी तर जुण्या शिस्त प्रिय शिक्षकांच्या आठवणीत .रममाण व भावनीक झाले. शाळेच्या बोलक्या भिंती मैदान वर्ग खोल्या जणु सर्वांना कवेत घेताय असा भास होत होता.शाळेच्या आवारात दिवसभर आनंदोत्सव साजरा केला. गिरीजा पात्रात असलेले पावन गणपती मंदिर व महादेव मंदिर यांचे सर्वांनी दर्शन घेऊन सध्या जगावर असलेले कोरोना महामारी चे संकट दूर होवो अशी प्रार्थना केली.
हल्लीचे जगणे कसे ताण तणावत्मक व गतीशील झाले आहे या मध्ये तुम्हाला आनंदात्मक काय आहे याचा विचार जरा कमीच होतो धावता-धावता थकून जाताना मग कोठेतरी विरंगुळा शोधला जातो जुन्या चार मित्रांच्या संगतीने कोठेतरी फेरफटका होतो एकत्रीत स्नेहभेट होते यातूनच जुण्या मित्रांचा सुरेख असा संगम साधला जातो असे आमुचे मार्गदर्शक,आवडते शिक्षक व विद्यालयाचे आता असणारे मुख्याध्यापक श्री.प्रकाश कळम सर यांनी शिकवलेली हे वाक्य लक्षात आले.असे सर्व माजी विद्यार्थी सांगत होते.
या ब्याच मधील
सर्व विद्यार्थी सामाजीक, राजकीय,शासकीय, शैक्षणिक, औद्योगिक, कृषी, अश्या प्रकारे विविध क्षेत्रात कार्यरत असून या कार्यक्रमा च्या निरोप समारंभाच्या स्नेह भोजनाचे आयोजन यशस्वी उद्योजक. सतीष बलांडे व सुरेश तुपे यांनी केले.
Can you be more specific about the content of your article? After reading it, I still have some doubts. Hope you can help me.