वृक्षारोपण करून वृक्षमित्र दिवस साजरा

youtube

वृक्षारोपण करून वृक्षमित्र दिवस साजरा.
नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेचा उपक्रम
उमरखेड :

मानवाला भरभरून दान देणाऱ्या वृक्षांवर प्रेम करण्याची भावना वृद्धिंगत करण्यासाठी नैसर्गिक पर्यावरण संवर्धन मानवता विकास संस्था उमरखेड यांनी १४ फेब्रुवारी हा दिवस वृक्षमित्र दिवस म्हणून साजरा केला.
झाडे लावण्याची गोडी वाढणे, लावलेली झाडे जतन करणे यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. झाड लावणे सोपे परंतु लावलेले झाड जतन करणे फार महत्त्वाचे, याबद्दल जनतेमध्ये वृक्षारोपणा संबंधी जनजागृती करणे, वृक्ष जतन करण्यासाठी प्रोत्साहन देणे, वृक्षांची योग्य निगा कशी राखता येईल, झाडाची वाढ योग्य प्रमाणात होते किंवा नाही यावर लक्ष ठेवणे, वृक्षांना पाण्याची व्यवस्था करणे, वृक्ष मानवाचा मित्र कसा याबद्दल जनजागृती करणे , जळत असलेले झाड वाचवणे ,रोपवाटीका तयार तयार करणे, वृक्षारोपण करणे इत्यादी अनेक उपक्रम राबवून वृक्षमित्र दिवस साजरा करण्याचे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.
नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेकडून वृक्षमित्र दिवसानिमित्त येथील नांदेड रोड लगतच्या जुन्या वीरशैव लिंगायत मोक्षधाम परिसरात वटवृक्ष लावून वृक्षमित्र दिवस साजरा करण्यात आला. वडाच्या झाडाला अक्षय वृक्षही म्हणतात . वडाच्या झाडाचे आयुष्य शेकडो वर्षे असते .भारतीय संस्कृतीमध्ये वडाच्या झाडाचे फार महत्त्व आहे .वडाचे झाड इतर झाडांच्या तुलनेत सगळ्यात जास्त प्राणवायू हवेत सोडतात . त्याच्या प्रत्येक फांदी, पारंबी पासून सुद्धा नवीन वटवृक्ष जन्म घेतो. म्हणून आयुर्वेदात या वृक्षाला अनन्यसाधारण महत्त्व आहे .म्हणूनच अशा बहुगुणी वृक्षांचे रोपण करण्यात आले.यासाठी नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेचे दीपक ठाकरे ,प्रभाकर दिघेवार, गजानन रासकर ,काशिनाथ कुबडे ,रामकिसन शिंदे ,यांच्यासह राजेश दिघेवार, विष्णू दुधेवार,विलास दुधेवार, शिवा हिंगमिरे इत्यादी वृक्षप्रेमी हजर होते.

Google Ad
Google Ad

1 thought on “वृक्षारोपण करून वृक्षमित्र दिवस साजरा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!