गांजेगाव सावळेश्वर रस्त्याच्या दुरुस्तीसाठी वंचित बहुजन आघाडी करणार जलसमाधी आंदोलन.
गांजेगाव ,सावळेश्वर रस्त्याच्या दुरुस्तीसाठी वंचित बहुजन आघाडी करणार जलसमाधी आंदोलन
उमरखेड प्रतिनिधी.
प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत ढाणकीते गांजेगाव ते शिंदगी, ढाणकी ते सावळेश्वर रस्ता दुरुस्तीसाठी निधी मंजूर होऊन, प्रशासकीय स्तरावर सदर दोन्ही रस्त्याच्या कामास मंजुरी मिळाली आहे, असे असताना सुद्धा नादुरुस्त असलेल्या या रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामास विलंब होत आहे, यामुळे गांजेगाव ,सिंदगी ,सावळेश्वर येथील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे,
गांजेगाव ते ढाणकी , सावळेश्वर ते ढाणकी, या रस्त्याची अतीशय दुरावस्था झालेली असून रस्त्यावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन अपघात होऊन अनेकांना आपला जीव गमवावा लागला, मराठवाड्यातील नागरिकांना उपचारासाठी याच रस्त्याने ढाणकी येथे यावे लागते, अनेक वेळा खराब रस्त्यामुळे वेळेत उपचार न मिळाल्यामुळे रुग्ण दगावल्याची घटना सुद्धा घडल्या आहेत, रस्ताच असलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे कंबरदुखी हाडाचे आजार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत, यामुळे येथील नागरिकांची गैरसोय लक्षात घेता निवेदनात नमूद केलेल्या दोन्ही रस्त्याच्या कामास आठ दिवसाच्या आत सुरुवात करावी, अन्यथा येथील स्थानिक नागरिकांना सोबत घेऊन वंचित बहुजन आघाडी तर्फे संबंधित विभागाच्या निषेधार्थ येथील पैनगंगा नदी पात्रात जलसमाधी आंदोलन करण्याचा इशारा, दिनांक 25 तारखेला निवेदनाद्वारे कार्यकारी अभियंता प्रधानमंत्री ग्राम सडक योजना यवतमाळ विभाग यांना उप अभियंता जिल्हा परिषद बांधकाम विभाग उमरखेड यांच्यामार्फत वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव जॉन्टि उर्फ प्रशांत विणकरे , उमरखेड तालुका अध्यक्ष संतोष जोगदंडे, नगरसेवक प्रमोद गायकवाड तालुका सचिव विष्णू वाडेकर प्रवेश वाडेकर गांजेगाव शाखाप्रमुख सुनील साखरे, उपशाखाप्रमुख राहुल झुकझुके, विनोद बर्डे सर, तालुका महासचिव मदार मौलाना,यांनी दिला आहे