जादूटोणा करत असल्याच्या संशयावरून पती-पत्नीला घर जाळून जीवे मारण्याचा प्रयत्न.

youtube

जादूटोण्याच्या संशया वरुण घर पेटविले सहा आरोपीना अटक
——————–
तालुक्यातील तरोडा गावातील घटणा

उमरखेड –
तालुक्यातील तरोडा गावातील भोरे दांम्पत्यावर जादुटोणा करता म्हणुन असा संशय घेवून सात जनानी सामुहीक रित्या जमवून घर पेटून दिले व त्यांना जीवे मारण्याचा पूरेपुर प्रयत्न झाला हि घटना २१ फेब्रूरवारी रोजी सायंकाळी ५ वाजच्या दरम्यान घडली या घटना प्रकरणी तरोडा येथील सहा जनाना पोफाळी पोलीसांनी अटक केली आहे
तरोडा गावात विनायक भोरे व त्यांची पत्नी उर्मिला भोरे हे दाम्पत्य घरीच असताना काही जन तोंडाला बांधुन त्यांच्या घरात शिरले तुम्ही जादू टोणा करता म्हणुन का जीवे मारण्यात येवू नये म्हणुन लाठया काठ्याने मारहाण केली व डिझेल टाकूण त्यांचे घर पेटून दिले हि हदयद्रावक घटना प्रथमच तालुक्यात तरोडा गावात घडली उर्मीला व विनायक ने मारेकऱ्यांच्या तावडीतुन कसे बसे सुटून आरडा ओरडा करूण घराबाहेर पडले या घटनेत दोन्हीदांम्पत मारहाण झाल्याने अत्यावस्थ झाले होते अश्या अवस्थेत पोफाळी पोलीसाणी घटना स्थळ गाठूण प्रथम उपचारतजवळ च्या मुळावा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले प्रकुती अधिक चिताजनक असल्याने उमरखेड येथील शासकीय उतवार रुग्णालयात आणले असता येथील डॉक्टर यांनी पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालय यवतमाळ या ठिकाणी उपचारासाठी पाठविण्यात आले विनायक भोरे यांची प्रकुती चिंताजनक असल्याने नागपूर येथील रुग्णालयात हलविण्यात आल्याची माहीती देण्यात आली
उर्मीला हि बेशुद्ध अवस्थेतुन बाहेर आल्या नंतर पोफाळी पोली सा ना घटणा क्रम कथन केला फिर्यादी उर्मीला भोरे ( ५० ) रा तरोडा त्यांच्या जबानी फिर्यादी वरुण आरोपी समाधान भुसारे ( ३० ) , प्रफुल भुसारे ( ३५ ) , आकाश धुळे ( ३० ), गोलू धूळे (२५), भगवान धुळे ( ४५), भिमराव धुळे ( ४५ ) सर्वजन तरोडा गावातील असुन त्यांना भादवी कलम ४३६ , ३०७ , १४३ , १४४ , १४८, १४९, ४५२ , अन्वे अटक करण्यात आली आहे अशी माहीती पोफाळी चे ठाणेदार राजीव हाके यांनी दिली या घटनेत भोरे दांम्पत्याचे घर व मोटार सायकल जळूण खाक झाले आहे अधिक तपास पोलीस उप निरीक्षक राजेश पंडीत पोलीस कर्मचारी राम गडदे , किसन राठोड हे करीत आहे
———-

Google Ad
Google Ad

1 thought on “जादूटोणा करत असल्याच्या संशयावरून पती-पत्नीला घर जाळून जीवे मारण्याचा प्रयत्न.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!