यवतमाळची अष्टपैलू महिला कर्मचारी शिवानी शिंदे.

यवतमाळची अष्टपैलू महिला पोलीस कर्मचारी शिवानी शिंदे…..
‘आपल्या लक्षवेधी कामगीरीने वेधले सर्वसामान्यांचे लक्ष’
उमरखेड,
राज्याच्या पोलीस दलात महिला पोलीस म्हणून कार्यरत असलेल्या शिवानी शिंदे या महिला पोलीस कर्मचा-याच्या अष्टपैलू कामगीरीने अनेकांना भुरळ घातली असून विविध क्षेत्रातील त्यांच्या भरीव कामगीरीने त्यांनी सर्वसामान्यांचे लक्ष वेधले आहे.
महाराष्ट्राच्या पोलीस दलातील यवतमाळ जिल्ह्यात शिवानी शिंदे ह्या पोलीस कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत. तथापि पोलीस दलात कार्यरत असताना त्यांच्या असलेल्या हॉकी या क्रिडाप्रकारातील निर्भेळ प्राविण्याची झलक दाखवताना अखिल भारतीय हॉकी खेळाडू स्तरावर आपल्या खेळातील प्राविण्याने आपली निवड करण्यास भाग पाडले. व यवतमाळ जिल्ह्यातील पोलीस खात्याची मान उंचावली. यामुळे तमाम यवतमाळ जिल्ह्याच्या पोलीस विभागासाठी त्या “माँ जिजाऊ” च्या भुमिकेतील एक रणरागीणी दिसून येत असून ‘माँसाहेबांच्या’ भुमिकेतील आईचे रूप आत्मसात करून अत्यंत सोज्वळ व निरागसपणे श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे यांचा अभिषेक करताना पुढे येत आहे.
एकीकडे पुरूषप्रधान संस्कृतीने सर्वसामान्य महिलांना जुन्या चालीरिती व बंधनात अडकविलेले असताना यवतमाळ जिल्ह्यातून राज्याच्या पोलीस दलाचे प्रतिनिधित्व करणा-या महिला पोलीस कर्मचारी शिवाणी शिंदे यांच्यात सर्वसामान्य नागरीक “झाशीच्या राणी” चे प्रतिबिंब पाहात असल्याची बोलकी प्रतिक्रिया सर्वसामान्यातून व्यक्त होत आहे…