नववधूला घेऊन जाणारा टाटा मॅजिक वर टेम्पोची जब्बर धडक नवरीसह सहा जन जागीच ठार.
नववधूला घेऊन जानाऱ्या टाटा मैजिक आणि टेम्पोची जबर धडक; नवरीसह ६ जण जागीच ठार …।
जखमी व मृतांची संख्या वाढण्याची शक्यता.
हिमायतनगर
भोकर-नांदेड-
धर्माबाद येथून परतणीचा कार्यक्रम आटोपून नातेवाईकांसह महिंद्रा मॅक्झिमो व्हॅनमधून गावाकडे पररत असताना समोरून येणार्या ट्रकची व्हॅनला भोकर – हिमायतनगर राष्ट्रीय महामार्गावर धडक बसली.
आज सायंकाळी ६ च्या सुमारास झालेल्या अपघातामुळे नवरीसह ६ जण जागीच ठार झाले असून, नवरदेव नागेश कनेवाड हा गंभीर जखमी झाला आहे. तसेच इतर ५ जण गंभीर जखमी झाल्याचे संगण्यात येत आहे. या महिंद्रा मॅक्झिमोत १२ जण होते असे समजते. यामुळे जखमी व मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. घटनास्थळी रक्ताचा सडा पडल्याचे चित्र दिसून आले आहे.
नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद तालुक्यातील जारीकोट येथील युवतीचा विवाह तीन दिवसापूर्वी उमरखेड तालुक्यातील साखरा येथील युवकासोबत झाला होता. तीन दिवसापूर्वी विवाह झालेली नववधू माहेरी परतणीचा कार्यक्रम करून सासरी जात असताना महिंद्रा मॅक्झिमो मिनीव्हॅन क्रमांक एम.एच.19 एआर 3219 ला समोरून येणार्या ट्रक क्रमांक एम.एच.04 एएल 9955 ची जबर धडक बसली. झालेल्या या अपघातात सहा जण जागीच ठार झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास भोकर – हिमायतनगर राष्ट्रीय महामार्गावरील सोमठाणा फाट्याजवळ घडली. अपघातातील जखमींना नांदेड व भोकर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ही धडक एवढी जबरदस्त होती की घटनास्थळी रक्ताचा सडा पडल्यासारखे चित्र दिसत होते. तर मरण पावलेल्यांचे हात पाय तुटून पडले होते. दोन्ही वाहने रस्त्याच्या खाली गेल्याने जेसीबी मशीनच्या सहाय्याने वाहनांना बाहेर काढण्यात आलआदरणीय सर,आज रोजी 0545 वाजता मेक्सीमो वाहन नंबर MH-29/AR-3219 हा नवरीची मांडव परतणी साठी जारीकोट ता.धर्माबाद येथुन साखरा ता.उमरखेड जि.यवतमाळ येथे जात असताना सोमठाणा शिवारात चटलावार यांच्या धाब्यासमोर हिमायतनगर कडुन नांदेडकडे टाटा 407 या विटा वाहतूक करणाऱ्या वाहनाने समोरुन धडक दिल्याने झालेल्या अपघातात 1) पुजा ज्ञानेश्वर पामलवार वय 21 रा।साखरा (नवरी )(2)दत्ता ज्ञानेश्वर पामलवार वय 22 (नवरीचा भाऊ) (3)माधव पुरबाजी सोपेवाड वय 30रा.जांबगाव ता.उमरी.(4)सुनिल दिंगाबर धोटे वय 28 रा.चालगणी ता।उमरखेड (मैजिक चालक )(5)अज्ञात ईसम असे मयत झाले असून जखमी नामे (1)नागेश साहेबराव कन्नेवार वय 28 रा.जारीकोट (2)अविनाश संतोष वंकलवाड रा.तामसा (3)अभिनंदन मधुकर कसबे वय 16 रा.वाजेगाव (4)सुनिता अविनाश तोपलवार वय 35 रा.तामसा (5)अनोळखी ईसम असे सरकारी दवाखाना नांदेड द
येथे रेफर केले आहे. घटनास्थळी एसडीपीओ सर व आम्ही भेट दिली असुन वाहतूक सुरळीत केली आहे. कायदा व सुव्यवस्था चा प्रश्न नाही. पुढील कारवाई चालू आहे.