महागाई विरोधात पुरोगामी युवा ब्रिगेड चा भोंंगाआंदोलन
- महागाई विरोधात पुरोगामी युवा ब्रिगेड चा भोंगा आंदोलन
छत्रपती चौकात आंदोलन ; भोंग्यातून सांगितली महागाई
उमरखेड /प्रतिनिधी :
पेट्रोल डिझेल, गॅस व मूलभूत वस्तूंवरील महागाई कमी करून आमचं जगणं सोपं कराव आणि महागाई चा चढता आलेख कमी करावा यासाठी उमरखेड च्या पुरोगामी युवा ब्रिगेड ने छत्रपती शिवाजी महाराज चौकात भोंगा आंदोलन केले.
सध्या देशात तीव्र महागाई असून ह्या महागाईचा आलेख दिवसेंदिवस वाढतच चाललेला आहे. सर्व वस्तूंचे दर हे वाढलेले आहेत. त्यात जीवनावश्यक वस्तूंचा सुद्धा समावेश असून त्वरित महागाई चा चढता आलेख रोखून पेट्रोल डिझेल, घरगुती गॅस तसेच दररोज लागणाऱ्या मूलभूत वस्तूंवरील टॅक्स कमी करून महागाई थांबवावी या मागण्यांसाठी पुरोगामी च्या कार्यकर्त्यांतर्फे चौकात निदर्शने व जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.यावेळी पुरोगामी चे जिल्हाध्यक्ष शिवशंकर सुरोशे, पुसद तालुका अध्यक्ष दत्ता वऱ्हाडे, नितीन शिंदे, तालुका उपाध्यक्ष परमेश्वर रावते, मनोज धुळध्वज, प्रफुल दिवेकर, विनोद वाढवे, अनिल हरणे, अनिल ढोबळे,आतिश वटाने, गजानन वानखेडे, शहराध्यक्ष शुभम जवळगावकर, निलेश कांबळे,सिद्धार्थ दिवेकर, शेख जावेद, आकाश माने, सुनील लोखंडे,नागराज दिवेकर, माधव ठोके, अनिल नरवाडे, अंबादास गव्हाळे,दत्ता दिवेकर,आकाश टोकालवाड, निकेश गाडगे, राजू गायकवाड,अथर खतीब, सय्यद जमीर, शिवप्रसाद तंगडवाड आदी उपस्थित होते.
चौकट :
“काही राजकीय नेते स्वतः च्या राजकीय स्वार्थासाठी भोंग्यातुन सामाजिक स्वास्थ बिघडविण्याचा प्रयत्न करीत आहेत. आम्ही सुद्धा त्यांच्या याच भोंग्यातून वाढती महागाईचा आलेख लोकांना सांगत आहोत. भोंग्यातून सांगण्यात येणाऱ्या नेत्यांच्या द्वेषयुक्त आवाजापेक्षा सर्वसामान्यांचा महागाई विरोधी आवाजाचा डेसिबल हा नेहमीच मोठा असेल… ”
शाहरुख पठाण
प्रवक्ता, पुरोगामी युवा ब्रिगेड
Your point of view caught my eye and was very interesting. Thanks. I have a question for you.
Thanks for sharing. I read many of your blog posts, cool, your blog is very good. https://www.binance.com/ur/register?ref=S5H7X3LP