गुंडवळ तांदळ रस्त्याच्या निस्कृष्ठ कामाची चौकशी करा .अन्यथा नांदेड जी.प समोर उपोषण.
गुंडवळ तांदळा रस्त्याच्या निस्कृष्ठ कामाची चौकशी करा अन्यथा नांदेड जीप समोर उपोषण!
माहूर ता.प्र.- नितीन तोडसाम
तालुक्यातील अतिदूर्गम व डोंगराळ भागात असलेल्या गुंडवळ- तांदळा- ईवळेश्वर या बहुप्रतिक्षित रस्त्यांचे काम अत्यंत निस्कृष्ठ होत असून अनेक तक्रारी व माध्यमात बातम्या प्रकाशित होऊन ही संबंधित विभागाकडून कामाची चौकशी होत नसल्याने व गुत्तेदराला अभय दिले जात असल्याने या परिसरातील जागरूक नागरिकांनी ३० मे पासून जिल्हा परिषद नांदेड समोर उपोषणा ला बसण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.
जि.प.बाधकाम विभाग जि.प.नांदेड उपविभाग किनवट यांच्या देखरेखी खाली प्रजिमा ६ पासून गुंडवळ-तांदळा-ईवळेश्वर ते प्रजिमा ६ रस्त्यांची सुधारना करने २/५०० ते ३/५०० कि.मी. असे डांबर रस्त्याचे अंदाजे ३५ लक्ष रुपयाचे काम सुरू आहे.जिप नांदेड अंतर्गत येत असलेल्या रुईफाटा ते गुंडवळ हा रस्त्या गेल्या अनेक वर्षा पासून उखडला असून मोठ – मोठे खड्डे या रस्त्यावर पडले होते. चारचाकी छोटे वाहना या रस्त्यावरून घेऊन जाणे म्हणजे तारेवरची कसरतच, गेल्या अनेक वर्षान पासून या गावातील नागरिक हा रस्ता कधी होईल यांची वाट पाहत होते. अखेर या रस्त्याचे काम रूईफाटा पासून काही दिवसा पूर्वी सूरू झाले. पंरतु अंदाजपत्रकास बगल देत निकृष्ट काम करून देयक उचलण्याचा मंसुब्यात असलेल्या गुत्तेदाराने थातुत मातुर काम करू न पलायन केले आहे.
रस्त्याच्या कामापूर्वी खोदकाम करणे,सफाई करून
मुरूम गिट्टी टाकून दबाई करणे अपेक्षित होते,परंतु संबंधित विभागाचा अभियंता या कामा कडे ढुंकून ही पाहत नसल्याने गुत्तेदराला फावले असून त्याने थातुर मातुर काम करून आपला घाशा गुंडाळला आहे.विशेष म्हणजे याच कामाचे अर्धे बिल मार्च पूर्वीच काढण्यात आल्याची माहिती असून जीप बांधकाम विभागाकडे कोणाचे ही लक्ष नसल्याने गुत्तेदार व त्यांच्या वर निघा ठेवणारे “माला माल” होत आहे. सदर निस्कृष्ठ कामाची गुण नियंत्रणा मार्फत चौकशी करून दोषी विरुद्ध कार्यवाही करावी अन्यथा ३० मे पासून जिल्हा परिषद समोर उपोषणाला बसणार असल्याचा इशारा राहुल कांबळे,रामेश्वर जाधव,भीमराव कांबळे,समाधान खंदारे यांनी दिलेल्या निवेदनात दिला आहे.