आजच्या शिक्षण व्यवस्थेत माणुस घडत नाही – राजश्री हेमंत पाटील.

youtube

आजच्या शिक्षण व्यवस्थेत माणुस घडत नाही -राजश्री पाटील

उमरखेड :
आजच्या शिक्षण व्यवस्था प्रणालीतून डॉक्टर , इंजिनिअर घडत आहेत . त्यांचे मोठमोठे पोस्टर बॅनर शहरों शहरी खाजगी शिकवणी घेणारे लावतात मात्र एखादा माणूस त्यांनी घडवुन त्यांचे पोस्टर लावल्याचे कुठेच दिसत नसल्याची खंत गोदावरी अर्बन बँकेच्या अध्यक्षा राजश्री पाटील यांनी व्यक्त केली .
आज दिनांक २८ रोजी वि .दा . सावरकर इंग्लीश मेडियम स्कूलच्या लोकार्पण सोहळ्यात त्याप्रमुख वक्त्या म्हणून बोलत होत्या .
यावेळी व्यासपिठावर उद्धाटक म्हणून कृष्णराव काळेश्वरकर,श्रीमती शालीनी पाटील,संगीता सिंगम,अँड सचिन पांडे,डाॅ.सचिन मामीडवार,प्रकाश उल्लंगवार,बाबाराव कदम,ओमसेठ सारडा,वसंतराव पांडे हे होते.तर अध्यक्ष म्हणून आमदार नामदेवराव ससाने उपस्थित होते.यावेळीप्रमुख अतिथी म्हणून नांदेड शहरमंत्री विद्या भारतीचे आदित्य तुंगेनवार, माजी आमदार उत्तमराव इंगळे , राजेंद्र नजरधने, विजयराव खडसे , तातू देशमुख , भाजपा जिल्हाध्यक्ष नितिन भुतडा राजुभैया जयस्वाल ,गटशिक्षणाधिकारी खांडरे  आदी उपस्थित होते .
यावेळी राजश्री पाटील यांनी शिक्षकांची श्रीमंती ही त्यांच्याजवळ किती पैसा जमा आहे , त्यांनी किती मजली घर बांधले यावरून होत नसून त्यांनी किती विद्यार्थी घडविले यावर त्यांच्या श्रीमंतीचे मोजमाप व्हायला पाहीजे.पण आजच्या शिक्षण व्यवस्थेमुळे ही विदारक परिस्थिती निर्माण झाल्याने समाजात डॉक्टर , इंजिनिअर तर निर्माण होत आहे मात्र माणूस निर्माण होणे बंद झाल्याचे त्या म्हणाल्या.
यावेळी प्रास्ताविकातून महेश काळेश्वरकर यांनी हि संस्था केवळ समाजातील तळागळातील लोकांचे हीत डोळ्यासमोर ठेवुन समाजहितासाठी काहीतरी करता येईल याच दृष्टीकोनातून वाटचाल करित राहणार असल्याचे सांगीतले . कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विशाल गिरी यांनी केले तर आभार मनोज पांडे यांनी मानले . कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गीरीषदेशमुख , गणेश शिन्दे, मिलिंद पांडे , मनिष भट्टड, भारतकुळकर्णी , अजय पांडे , राजू देशपांडे , योगेश बोकन , मनोज देव, मंगल पांडे , प्रशांत आयचीत, प्रेरणा कुदे , गणेश पानबुडे , दिगांबर भोयर , विजय गुजरे , संजीव मुडे , शशीकांत पांडे , गजानन कोडगीरवार , गोपाल जगत , गजानन बोराळकर , पुंडलिक कुबडे , अनिल देशपांडे , गणेश कान्नव, लक्ष्मीकांत लिगदे, मनिषा काळेभ्वरकर ,योगिनी पांडे , शुभदा देशपांडे , सविता पाचकोरे, सुनिल मांजरे , निखील आलेवार, यांनी परिश्रम घेतले .
सोबत फोटो :
राजश्री हेमंत पाटील बोलतांना

Google Ad
Google Ad

2 thoughts on “आजच्या शिक्षण व्यवस्थेत माणुस घडत नाही – राजश्री हेमंत पाटील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!