स्वामी विवेकानंद ज्युनियर कॉलेज, हरदडा चा निकाल 100%
स्वामी विवेकानंद ज्युनियर कॉलेज, हरदडा चा निकाल 100%
उत्कृष्ट निकालाची परंपरा ठेवली कायम
उमरखेड / प्रतिनिधी :
नुकताच एच एस सी बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून यामध्ये हरदडा येथील स्वामी विवेकानंद ज्युनिअर कॉलेज चा निकाल शंभर टक्के लागला असून एकूण 75 विद्यार्थी या परीक्षेला बसले होते. यापैकी 40 विध्यार्थी हे 80% पेक्षा जास्त गुण घेऊन पास झाले असून इतर सर्व विद्यार्थी उत्कृष्ट गुणांनी पास झाले आहे. विद्यालयाने आपल्या उत्कृष्ट निकालाची परंपरा याही वर्षी कायम ठेवली आहे.
महाविद्यालयात प्रथम येण्याचा बहुमान आदित्य अजय जयस्वाल याने मिळवला असून त्याला 94.33% इतके गुण मिळाले आहे तर अभिषेक मिलिंद जाधव 90.50% व कु.प्रांजली दिगांबर नलावडे 88.50% येवढे गुण घेऊन विध्यार्थ्यानी यश प्राप्त केले आहे.
स्वामी विवेकानंद ज्युनिअर कॉलेज हे 100% निकाल देणारी शैक्षणिक संस्था असून दरवर्षी उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम ठेवत या वर्षी सुद्धा 100% निकाल देत ही परंपरा कायम ठेवली आहे. या विद्यालयाचे एकूण 75 विध्यार्थी हे एच एस सी बोर्ड परीक्षेसाठी बसले होते त्यापैकी सर्वच्या सर्व विध्यार्थी हे पास झाले असून यामध्ये श्वेता नलावडे 87.83% , प्रतीक्षा मोरे 87.33%, वेदांत शिंदे 87% ,ईशराक शेख 87% , अमेय बालपांडे 86.50% , प्रतीक्षा गोरेलू 86.33%, साक्षी वाघमारे 85.17% आदी विध्यार्थ्यानी यश प्राप्त केले आहे.
यशस्वी विध्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत असून संस्थेचे अध्यक्ष डॉ नरेश गंदेवार, सचिव विजय जयस्वाल, संतोष तिरमकदार, गणपत गजेलवाड, विद्यालयाचे प्राचार्य प्रा.मैत्रेय देशमुख आदींनी शुभेच्छा दिल्या आहेत.