उमरखेड तालुक्यात १० जुलै पासून ड्रोन सर्वे सुरू होणार – सुभाष चव्हाण भूमापक
उमरखेड तालुक्यात १० जुलै पासून ड्रोन सर्वे सुरू होणार –
सुभाष चव्हाण भूमापक
उमरखेड
महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग यांचे दिनांक 22 फेब्रुवारी 2019 चे निर्णयानुसार राज्यातील सर्व गावाच्या गावठाणातील जमिनीचे जी. आय.एस आधारित सर्वेक्षण व भूमापन करण्याबाबत शासनाने मंजुरी दिली आहे. सदर योजना ग्राम विकास विभाग मंत्रालय मुंबई महा जमाबंदी आयुक्त आणी संचालक भूमी अभिलेख महाराज्य पुणे यांच्या कार्यालय भारतीय सर्वेक्षण विभाग डेहराडून यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत आहे . योजनेअंतर्गत सर्व गावाची भूमापन करून मिळकत पत्रिका स्वरूपात अधिकार अभिलेख तयार करणे व गावातील मालमत्तेचे जीआयएस प्रणाली आधारित मालमत्ता पत्रक तयार करण्याचे आहे आपल्या गावाची गावठाणाची हद्द निश्चित करण्याकरिता उमरखेड मध्ये 10 जुलैपासून ड्रोन सर्वेक्षण सुरुवात करण्यात येत आहे .त्यामध्ये उमरखेड तालुका मधे 10 जुलै पासून ड्रोन सर्वे सुरू होणार आहे अशी माहिती सुभाष चव्हाण भूमापक यांनी सांगितले आहे उमरखेड तालुक्यातील सर्व नागरिकांना आव्हान करण्यात येते की दिनांक दहा जुलै पासून ड्रोन सर्व्हेचे काम सुरू होत आहे या योजनेमध्ये उमरखेड तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांनी लाभ मिळणार आहे. प्रत्येक घरा घरा साठी लागणारा गाव नमुना 8 हे बंद होऊन मिळकत पत्रिका व घरचे नकाशा स्वतःच्या मालकीचा मिळणार आहे. तरी सर्व नागरिकांनी या योजनेत सर्वांनी सहकार्य करावे व या उपक्रमात आपले गावचे ग्रामसेवक ग्रामपंचायत कार्यालयाचे ग्रामसचिव व गावातील सर्व नागरिक यांनी गाव ठाणा ला लागून असलेले आपल्या गटाच्या हद्दी दाखविण्याचे असून त्याप्रमाणे गावठाणाची हद्द निश्चित करण्यात येणार आहेत व त्यानंतर गाव ठाण्याच्या हद्दीतील सर्व मिळकतीचे ड्रोनद्वारे भुमापनाचे काम सुरू होणार आहे तरी सर्व ग्रामस्थ यांनी हा प्रकल्प यशस्वीपणे पूर्ण होण्याकरिता सहकार्य करावे. असे सुभाष चव्हाण भूमापक व सुभाष शिंदे उप अधिक्षक भुमीलेख यांनी केले सागितले आहे.
I don’t think the title of your article matches the content lol. Just kidding, mainly because I had some doubts after reading the article. https://accounts.binance.com/ar/register-person?ref=YY80CKRN