आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत जीवाचे रान करुन शिवसेनेचा भगवा फडकविणार – नितीन कन्नलवार.
आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत जीवाचे रान करुन शिवसेनेचा भगवा फडकविणार – नितीन कन्नलवार
श्रीक्षेञ माहूर – नितीन तोडसाम
माहुर तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समीती निवडणुकीचा बिगुल वाजला असुन वयाच्या पंधराव्या वर्षापासुन शिवसेना पक्षाचे काम अगदी निस्वार्थी पणे हिंदुह्दय सम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रेरणे नुसार व उप.जिल्हा प्रमुख ज्योतीबादादा खराटे यांच्या मार्गदर्शनात माहुर तालुक्यात मागील अनेक दशकात शिवसेनेचा भगवा फडकला असुन प्रत्येक निवडणुकीत मी व माझे सवंगडी महत्वाची भुमिका बजावत असतो आणि आत्ता सुध्दा आगामी जि.परिषद व पं.समिती निवडणुकीत शिवसेना पक्षाच्या विजयासाठी जिवाचे रान करुन भगवा फडकविणार असे पञकारांशी चर्चा करतांना नितीन कन्नलवार पाटील यांनी व्यक्त केले.
तेव्हा पुडे बोलतांना नितीन पाटील म्हणाले कि,वानोळा गटातून जि.परिषद निवडणुक लढविण्यास पक्षाने मला आदेश दिल्यास मि संपूर्णं तागदीनिशी लडवुन यश संपादन करत शिवसेनेचा भगवा फडकविणार असा ठाम विश्वास दाखविला आहे.वानोळा गटातील मतदार राजांने प्रत्येक जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत शिवसेनेला मतदान रुपी चांगले आर्शिवाद मिळाले असून या वेळी अधीकची तागद लावून वानोळा जिल्हा परिषद निवडणुकीच्या माध्यमातून वानोळा गटावर भगवाच फडकविणार असा विश्वास मला आहे.पक्षाने मला लढविण्याचा आदेश न दिल्यास एक सच्चा शिवसैनिक म्हणून पक्षाचे काम निरंतर करेन असा आशावाद शेवटी बोलतांना पाटील यांनी केला आहे.
Thank you for your sharing. I am worried that I lack creative ideas. It is your article that makes me full of hope. Thank you. But, I have a question, can you help me?