शितल सक्सेस मंत्र करिअर मार्गदर्शन शिबीराचे आयोजन.
शितल सक्सेस मंत्र
करिअर मार्गदर्शन शिबीराचे आयोजन
उमरखेड..
-पार्वती ग्रुप उमरखेड व शीतल लढा रिसर्च सोसायटी द्वारा गोपिकाबाई गावंडे महाविद्यालय उमरखेड येथे विद्यार्थ्याकरिता करिअर मार्गदर्शन शिबराचे आयोजन करण्यात आले होते, याकरिता प्रमुख मार्गदर्शक म्हणून अहिल्याबाई होळकर विद्यापीठ सोलापूर चे नवोपक्रम व नसंशोधन विभागाचे संचालक डॉ सचिन लढ्ढा व वाॅटर टेक्नॉलॉजी व वाॅटर ट्रीटमेंट कार्य करणारे सॅमविद इंटरनॅशनल प्रा ली चे संचालक मुकुंद पात्रीकर उपस्थित होते. शैक्षणिक जीवनात यशस्वी होण्यासाठी केवळ मार्क्स आवश्यक नसून जिद्द, काहीतरी वेगळे करण्याचे पागलपण असणे आवश्यक आहे नाहीतर माझ्या सारखा बारावी मध्ये कमी मार्क्स असलेला विद्यार्थी आज सोलापूर विद्यापीठाचा संचालक होवू शकतो तर तुम्ही पण चांगल्या पदावर जावू शकता. सक्सेस= ७५% एटीट्युड+१५% स्कील+१० % नाॅलेज हे सुत्र विद्यार्थ्यानी अंगीकारणे आवश्यक आहे.येणारा काळ हा स्पर्धेचा , तंत्रज्ञान व कौशल्य आधारित शिक्षणाचा असल्याचे मत डॉ सचिन लढ्ढा यांनी मांडले. विध्यार्थ्यांना भविष्यात पाणी या विषयावर खूप मोठा स्कोप असून पार्वती ग्रुप व सॅमविद इंटरनॅशनल च्या माध्यमातून वाॅटर एक्सपर्ट तयार करण्यात येणारकिती उपयुक्त प्रशिक्षण कोर्सेस लवकरच सुरू करणार असल्याचे मत मुकुंद पात्रीकर यांनी मांडले. विषयावर शिक्षण घेता येईल. व्यावहारिक ज्ञानावर प्रत्यक्षिकातून शिक्षण यावर भर हे वैशिष्ट असल्यामुळे विध् दरमहिन्याच्या चौथ्या शनिवारी प्रत्यक्ष उमरखेड येथे उपलब्ध राहून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण याविषयी संवाद साधनार असल्याचे सांगितले. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून गो सी गावंडे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एम बी कदम सर, तर प्रमुख पाहुणे म्हणून उपप्राचार्य प्रविण गुजर सर , पर्यवेक्षक लाभसेटवार सर, नटराज निकेतन नागपूर च्या अध्यक्ष सौ पात्रीकर, पंचायत समिती महागाव चे सहाय्यक प्रशासन अधिकारी रत्नाकर पुजारी,नागपूर लोकमत समुहाचे जेष्ठ पत्रकार प्रदिप तिजारे,पार्वती ग्रुप चे सदस्य बालाजी शिरडकर सर्व प्राध्यापक वृंद व विद्यार्थी उपस्थित होते.पार्वती ग्रुप च्या माध्यमातून मागील आठ वर्षापासून विविध तज्ञांचे नियमित मार्गदर्शन शिबीर नीट, जेईई व स्पर्धा परीक्षांची तयारी करणा-या विद्यार्थ्याकरीता आयोजित करण्यात येतात.
Your point of view caught my eye and was very interesting. Thanks. I have a question for you. https://www.binance.com/ph/register?ref=B4EPR6J0
Thanks for sharing. I read many of your blog posts, cool, your blog is very good.