चक्क ढाणकीत जबरी घरफोडी. 40 तोळे चांदी , 6 तोळे सोने सह 1 लाख 20 हजार कॅश चोरटयांचा डल्ला.
चक्क ढाणकीत जबरी घरफोडी.
40 तोळे चांदी , 6 तोळे सोने सह 1 लाख 20 हजार कॅश चोरटयांचा डल्ला.
ढाणकी –
ढाणकीत घरफोडीच्या घटनेने पुन्हा एकदा डोकेवर काढले.ढाणकीतील भुसार व्यापाऱ्याचे घर फोडून 40 तोळे चांदी,6 तोळे सोन्यासह 1 लाख 20 हजार नगदी कॅश वर हात साफ करूण चोरटयांनी पोबारा केल्याची घटना 30 आॅगस्ट 2022 रोजी सकाळी 10 वाजता उघडकीस आली.
या घटनेचे सविस्तर वृत असे की,बालाजी ट्रेडींग कंपनी नावाचे भूसार दुकाण भैरूलाल बाबुलाल पडवाळे हे आपल्या राहत्या घरी खालच्या मजल्यावर अनेक वर्षा पासून आपल्या स्वतःच्या मालकीच्या बिल्डींगमध्ये चालवतात.घटनेच्या दिवषी 29 आॅगस्ट रोजी त्यांच्या भावाच्या मुलीचा मुळ गावी सोनदाबी येथे जावळाचा कार्यक्रम असल्यामुळे ते कुटूंबासह अंदाजी दु 12 वाजता गावाकडे गेले होते.पाळतीवर असलेल्या चोरटयाने हे हेरले व मध्यरात्री त्यांच्या घराच्या पष्चिमेकडील लोखंडी गेटचे कुलूप तोडून पायऱ्या चढून दुसऱ्या मजल्यावर प्रवेश केला.त्यानंतर लोखंडी राॅडच्या साहायाने चोरटयाने कपाट उघडले व त्यामध्ये असलेले 16 तोळे चांदीचे साखळया, चांदीचे हातकडे व 6 तोळे सोन्याची चैन सह एक लाख विस हजार रू.कपाटातील नगदी रोकड घेवून चोरटे पसार होण्यात यशस्वी झाले.
दरम्यानच्या काळात चोरटयांनी देव घरातील देवासह कपडयांची व इतर सामानाची फेकाफेक करून आणखी काही ठिकाणी असलेला मुद्देमाल हाती लागते का या उद्देशाने संपूर्ण घराची झडती घेतली.सकाळी 10 वाजे दरम्याने 30 तारखेला सकाळी 10 वाजेदरम्यान भैरूलाल पडवाळे यांच्या मोठया मुलाचा मित्र खेळण्यासाठी त्यांच्या घरी आला असता त्यांच्या घराची लोखंडी दाराचे कुलूप उघडे असल्याचे लक्षात आले.त्यांनी बाजूला असलेल्या हिरोहोंडा शोरूमच्या नौकराच्या भ्रमणध्वनीवरून पडवाळे यांना हि वार्ता कळविले.पडवाळे यांनी घटनास्थळी धाव घेताच आपल्याघरी चोरी झाल्याचे लक्षात आल्याने त्यानी ही बाब भुसार व्यापारी असोसीयनचे अध्यक्ष रूपेशभंडारी यांना भ्रमणध्वनीवरून कळविले.भंडारी यांनी घटनास्थाळी धाव घेवून बिटरगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रताप भोस यांना माहिती मिळताच त्यांनी आपल्या ताफासह घटनास्थळाला भेट देवून पंचनामा केला.व चोरटयांच्या तपास करण्यासाठी स्वान पथक व फिंगरप्रींट चे अधिकाऱ्यांना पाचारण केले. हेड काॅन्स्टेबल किशोर एडये श्वान लुसीला घटनास्थळाकडे नेले असता तिने चोरटयांचा मागोवा ढाणकी बिटरगाव रस्त्यापर्यंत दाखविला. बातमी लिहेपर्यंत पोलीसांचे तपासकार्य सुरू होते. ठाणेदार प्रताप भोस यांच्या मार्गदर्षनााखाली पोलीस उपनिरीक्षक कपील मस्के,ढाणकी बिट जमादार मोहन चाटे,गजानन खरात,निलेष भालेराव,दत्ता कुसराम,सतीश चव्हाण इत्यादी पोलीस कर्मचारी धाडषी चोरीच्या तपासाची चक्रे वेगाने फिरवित गावातील दुकाणावरील सि.सि.टि.व्ही वरील फुटेज चेक करणे चालू आहेत.