उमरखेड तालुक्यातील मारलेगाव जवळ एसटी बस चा भीषण अपघात.

youtube

उमरखेड तालुक्यातील मारलेगाव जवळ एसटी बस चा भीषण अपघात

उमरखेड..

आज दिनांक 26/09/2022 रोजी 4:30 ते 4:45 च्या दरम्यान घडला असुन अपघाताचे कारण एसटी बसचा समोरील टायर ब्लास्ट झाल्यामुळे अपघात घडला अशी माहिती समोर आली आहे. संतोष गंगाधर काळबांडे वय 38 वर्ष राहणार हादगाव जिल्हा नांदेड यांचा या अपघातात मृत्यू झाल्याची माहिती आली असून विठ्ठल व्यंकटी मुंडे वय 40 वर्षे कंधार डेपो वाहनचालक तसेच मारुती टिकाराम नरवाडे वय 75 वर्षे राहणार वाटेगाव तालुका हदगाव जिल्हा नांदेड या दोघांना गंभीर मार असल्यामुळे पुढील उपचारासाठी नांदेड येथे पाठविले गेले आहे यांच्याशिवाय इतर सात प्रवाशांना मार लागल्यामुळे यांचेवर उमरखेड येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची माहिती पुढील प्रमाणे आहे. सविता मानंदराव नरवाडे पिंपळगाव ता. उमरखेड,
सिमा जामोदकर 25 मुगट ता.मुखेड,
रोशणी जामोदकर 36 मुगट ता.मुखेड, जनाबाई धोंडीबा कांबळे 60 येळेगाव ता. कळमनुरी, वच्छलाभई बढोराम काळे 75 येळेगाव ता. कळमनुरी, कपिल दिलीपराव साळवे 29 डोलारी ता. हिमायतनगर, मारोती माधव शिंदे 65 कुपटी ता माहुर. अपघातामध्ये एका टेम्पोचा सुद्धा समावेश असून पुढील तपास एसटी प्रशासन अधिकारी तसेच पोलीस प्रशासन अधिकारी करीत आहेत.

Google Ad
Google Ad

4 thoughts on “उमरखेड तालुक्यातील मारलेगाव जवळ एसटी बस चा भीषण अपघात.

  1. I don’t think the title of your article matches the content lol. Just kidding, mainly because I had some doubts after reading the article.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!