प्रेस संपादक व पत्रकर सेवासंघाची मुखेड तालुका कार्यकारिणी जाहीर तालुकाध्यक्ष जयभीम सोनकांबळे तर सचिव विठ्ठल कल्याणपाड यांची सर्वानुमते निवड.
प्रेस संपादक व पत्रकर सेवासंघाची मुखेड तालुका कार्यकारिणी जाहीर
तालुकाध्यक्ष जयभीम सोनकांबळे तर सचिव विठ्ठल कल्याणपाड यांची सर्वानुमते निवड.
मुखेड, नांदेड : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, महाराष्ट्र राज्य या संघटनेची मुखेड तालुका कार्यकारणी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड जिल्हाध्यक्ष संजीवकुमार गायकवाड, जिल्हा उपाध्यक्ष उद्धव मामडे, जिल्हा सचिव भारत सोनकांबळे बेटमोगरेकर यांच्या उपस्थितीत मुखेड तालुका नूतनकार्यकारिणी जाहीर करण्यात आली. या नूतन कार्यकारणीमध्ये मुखेड तालुकाध्यक्ष जयभीम सोनकांबळे, उपाध्यक्ष रवी सोनकांबळे, सचिव विठ्ठल कल्याणपाड, सहसचिव आसद बल्खी,कोषाध्यक्ष मोतीपाशा पाळेकर, सल्लागार नागनाथ गायकवाड व सहकोषाध्यक्ष मोहम्मद रफीक यांची सर्वानुमते निवड घोषीत करण्यात आली आहे. दि.२७ सप्टेंबर २०२२ रोजी दुपारी दोन वाजता मुखेड येथील विश्राम गृहात झालेल्या बैठकीत नांदेड जिल्हाध्यक्ष संजीवकुमार गायकवाड,नांदेड जिल्हाउपाध्यक्ष उद्धव मामडे,नांदेड जिल्हासचिव भारत सोनकांबळे बेटमोगरेकर यांच्या हस्ते मुखेड तालुका नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले.
पत्रकार व कुटुंबाच्या न्याय हक्कासाठी लढणारी एकमेव संघटना असून पत्रकारिता करित असताना पत्रकारांना ज्या समस्यांना सामोरे जावे लागते त्या समस्या संघटनेकडे मांडाव्यात असे प्रतिपादन जिल्हाध्यक्ष संजिवकुमार गायकवाड यांनी केले.
कार्यक्रमाचे निवेदन जिल्हासचिव भारत सोनकांबळे बेटमोगरेकर तर आभार नूतन तालुकाध्यक्ष जयभीम सोनकांबळे यांनी मानले. यावेळी संपादक सुभाष नाईक, भोकर तालुका उपाध्यक्ष दत्ता बोईनवाड यांच्यासह प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे पदाधिकारी व पत्रकार उपस्थित होते.पत्रकार म्हणून काम करीत असताना ज्या अडचणी किंवा समस्यांना सामोरे जावे लागत आहे त्यांनी आपल्या समस्या संघटनेकडे मांडाव्यात व शिक्षणापासून कोणीही वंचित राहू नये यासाठी आम्ही प्रयत्न करणार असून असे विद्यार्थी आढळले तर संघटनेशी संपर्क साधावा असे नांदेड जिल्हाध्यक्ष संजीवकुमार गायकवाड यांनी प्रतिपादन केले. संघाचे नूतन मुखेड तालुका अध्यक्ष जयभीम सोनकांबळे यांनी मुखेड तालुका कार्यकारिणी वर्षभरात वेगवेगळे उपक्रम राबविणार असल्याचे सांगितले. याप्रसंगी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे पदाधिकारी व पत्रकार उपस्थित होते.
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या मुखेड तालुका नूतन कार्यकारिणीस संघाचे राज्य, विभाग, जिल्हा व तालुका पदाधिकाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या.