गांजेगाव-सोईट येथे ३३ के.व्हीं सबस्टेशन देण्यात यावे.
गांजेगाव-सोईट येथे ३३ के.व्हीं सबस्टेशन देण्यात यावे.
[गांजेगाव-सोइट येथील शेतकऱ्यांची मागणी.]
*ढाणकी/प्रतिनीधी :*
सध्या सर्वत्र रब्बी पीकाची पेरणी झाली असून, शेतात सिंचनाची सोय असून सुध्दा लोड शेडींग व दिवसाची आठ तास विद्युत असून वारंवार १० ते १५ मिनिटांनी विद्युत बंद होत असल्याने अक्षरशः पिक् वाळत आहे. त्याचबरोबर वसंत सहकारी साखर कारखाना हा पुर्ववत सुरू झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या व बऱ्याच शेतकऱ्यांनी जोमाने उसाची लागवड केली असून, सध्या स्थितीत उसाला अंबोनी पाण्याची अत्यंत आवश्यकता आहे. परंतु शेतात सिंचनाची सोय असून सुद्धा लोड शेडींग व आठ तास विद्युत अविरत मिळत नसल्याने व दहा ते पंधरा मिनिटांनी विद्युत बंद होत असल्यामुळे, शेतकऱ्यांना शेती करणे अतिशय जिकिरीचे झाले आहे . शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेऊन गांजेगाव व सोईट येथे ३३ के.व्ही सबस्टेशन देण्यात यावे. या मागणीसाठी गांजेगाव व सोईट शिवारातील शेतकऱ्यांनी भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा व विद्यमान आमदार नामदेव ससाने यांच्याकडे निवेदन देण्यात आले.
यावेळी गांजेगाव व सोईट शिवारातील शेतकरी बळवंतराव नाईक, विठ्ठलराव पंडागळे ,दिगंबरराव नाईक, वसंत फुलकोंडवार, संभाजी शिरडकर, शिवप्रसाद वंजारे, प्रभाकर पांडे, अशोक नरमवाड, विश्वनाथ पंडागळे, शिवहार पळसकर,सुभाष टेकाळे, संजय दिवशे ई. शेतकरी उपस्थित होते.
Thank you for your sharing. I am worried that I lack creative ideas. It is your article that makes me full of hope. Thank you. But, I have a question, can you help me? https://www.binance.info/bg/join?ref=V2H9AFPY