त्या घटनेचे चित्रकरण करणाऱ्या पत्रकारावरील अन्यायाविरोधात पत्रकार आक्रमक.
त्या घटनेचे चित्रकरण करणाऱ्या पत्रकारावरील अन्यायाविरोधात पत्रकार आक्रमक
उमरखेड.
पुणे येथील एका कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण मंत्री माननीय चंद्रकांत पाटील यांच्यावर भीमसैनिक मनोज गरबडे यांनी चंद्रकांत दादा पाटील यांचे कडून महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व कर्मवीर भाऊराव पाटील या महापुरुषां बद्दल अपमान जन्य वक्तव्य केल्याचे निषेधार्थ पुणे येथे त्यांच्या अंगावर शाही फेकण्यात आली या घटनेचे चित्रीकरण वृत्तांकन करण्याचे दृष्टीने पुणे येथील आयबीएन लोकमतचे प्रतिनिधी गोविंद वाकडे यांनी केले असता सदर प्रकरणात गोविंद वाकडे यांना सामील असल्याचा खोटा आरोप पोलिसांनी करून भीमसैनिक मनोज गरबडे यांच्यासह पत्रकार गोविंद वाकडे यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले या घटनेबाबत पोलिसांच्या गैरकृतीचा पोलीस प्रशासनाचा व हुकूमशाही प्रवृत्ती विरोधात प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य यांनी शासनाला निवेदन दिले पत्रकार विरोधात केलेला कट हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ वर करण्यात आला असून महाराष्ट्रातील पत्रकार कदापि सहन करणार नाहीत पत्रकार गोविंद वाकडे यांच्यावरील सर्व गुन्हे मागे घेण्यात यावे अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असे निवेदन प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ उमरखेड च्या वतीने उपविभागीय अधिकारी तसेच तहसीलदार उमरखेड यांना देण्यात आले. यावेळी राज्य उपाध्यक्ष सविता चंद्रे जिल्हाध्यक्ष अनिल राठोड, युवा जिल्हाध्यक्ष मारुती गव्हाळे, तालुका अध्यक्ष विलास चव्हाण, जिल्हा सचिव सुनील ठाकरे, तालुका सचिव बाबा खान, जिल्हा उपाध्यक्ष संदेश कांबळे, गजानन भारती, हरिदास इंगोलकर, ,अर्चना भोपळे ,शेख इरफान, प्रवेश कवडे, राजू गायकवाड, अशोक गायकवाड व संघटनेचे सदस्य वर्ग उपस्थित होते.
Your article helped me a lot, is there any more related content? Thanks!
Thank you very much for sharing, I learned a lot from your article. Very cool. Thanks. nimabi