ढाणकी येथे कडकडीत बंद {चंद्रकांत पाटील यांनी बेताल वक्तव्य केल्याबद्दल ढाणकी येथे कडकडीत बंद} –

youtube

ढाणकी येथे कडकडीत बंद
{चंद्रकांत पाटील यांनी बेताल वक्तव्य केल्याबद्दल ढाणकी येथे कडकडीत बंद}
ढाणकी –

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजां विषयी काढलेल्या बेताल वक्तव्य आणि चंद्रकांत पाटील यांनी महात्मा ज्योतिराव फुले, कर्मवीर भाऊराव पाटील तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल अपमानकारक वक्तव्य केल्या प्रकरणी दिनांक 13 डिसेम्बर रोजी ढाणकी शहरातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, मनसे, वंचित बहुजन आघाडी च्या वतीने शहर बंद चे आयोजन करण्यात आले होते.
चंद्रकांत पाटील यांनी दिनांक ०८ डिसेंबरला पैठण येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ संचालित प्रमाणपत्र वितरण सोहळ्यात बोलताना ‘यापूर्वी कर्मवीर भाऊराव पाटील, महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब
आंबेडकरांनी शाळा काढल्या त्यासाठी सरकारी अनुदान घेतले नाही. भीक मागून शाळा उभ्या केल्या’ असे वक्तव्य केले. कर्मवीर भाऊराव पाटील, महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे महाराष्ट्रातील तमाम जनतेचे मानबिंदू असल्यामुळे जनतेची मने दुखावल्या गेली आहे. त्यांच्या वक्तव्यामुळे व वागणुकीमुळे अनेकांच्या मनाला क्लेश निर्माण झाला असून त्यामुळे व्यथित होऊन
ढाणकी बंद चे आयोजन करून राज्यपाल हटाव त्याच बरोबर चंद्रकांत पाटील यांना मंत्री पदावरून खाली करा अशी मागणी निवेदनातून करण्यात आली
दिनांक 14 डिसेम्बर रोजी आयोजका कडून सकाळी जुने बस स्थानक परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला हारअरर्पण करून मोर्च्याला सुरवात करण्यात आली यावेळी अनेक मान्यवरांनी आपल्या मनोगतातून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणी त्यांच्या मंत्री मंडळातील चंद्रकांत पाटील यांचा निषेध नोंदविला ढाणकी बंदला व्यापाऱयांनी संपूर्ण दिवस आपापली प्रतिष्ठाने बंद ठेऊन पाठिंबा दिल्याचे दिसत होते.
मोर्चेकर्यांना ठाणेदार प्रताप भोस यांनी स्थानबद्ध करून सोडण्यात आले.

Google Ad
Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!