कुटुंब लग्न समारंभ गेले असता चोरटे घरात शिरले पन्नास तोळ्यांचे दागिने लांबविले.

youtube

कुटुंब लग्न समारंभ गेले असता चोरटे घरात शिरले पन्नास तोळ्यांचे दागिने लांबविले

सोने – चांदीसह रोख रकम चोरटयाने केली लंपास

उमरखेड : –

घरातील मंडळी लग्न कार्यासाठी बाहेरगावी गेलेली असल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी दि . 13 डिसेंबरचे रात्री घराचे कुलुप तोडून 50 तोळे सोने , अडीच किलो चांदी व रोख 80 हजार रुपये अशा लाखो रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केल्याची घटना उमरखेड बस स्टँड समोरील बिल्डींगमध्ये घडली .
कैलास हरिभाऊ शिंदे हे लग्न कार्या निमित्ताने परिवारासह माहुर येथे दि. 13 डिसेंबर रोजी सायंकाळी 4 वाजताचे सुमारास गेले होते . ते 14 डिसेंबर रात्री 9:30 वाजताचे सुमारास घरी परतले असता त्यांना घराचा मुख्य दरवाजा तोडलेला दिसला व घरातील कपाट फोडलेले तसेच सामान अस्ताव्यस्त केलेले दिसले . मुलीच्या लग्नासाठी त्यांनी नुकतेच खरेदी केलेले 50 तोळे सोने व अडीच किलो चांदी व रोख 80 हजार रुपये असा एकंदरित 28 लाख रुपयांचा ऐवज दि . 13 डिसेंबरचे रात्री चोरट्यांनी चोरून नेल्याचे कैलास शिंदे यांच्या निदर्शनास आले . हा धक्कादायक प्रकार पाहिल्यानंतर घटनेची माहिती त्यांनी तत्काळ पोलीस स्टेशनला दिली . पोलिसांनी घटनास्थळ पंचनामा करून यवतमाळ ठसे तज्ञांना पाचारण केले आहे . राष्ट्रीय महामार्गावरील शहरातील रात्रंदिवस गजबजलेल्या व पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या बस स्टँड परिसरात घडलेल्या या चोरीच्या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांकडून पोलिसांच्या कार्य क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्या जात आहेत .

Google Ad
Google Ad

1 thought on “कुटुंब लग्न समारंभ गेले असता चोरटे घरात शिरले पन्नास तोळ्यांचे दागिने लांबविले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!