उमरखेड वकिलसंघाच्या अध्यक्षपदी ॲड. संतोष आगलावे तर सचिवपदी ॲड. वैभव डांगे यांची निवड.
उमरखेड वकिलसंघाच्या अध्यक्षपदी ॲड. संतोष आगलावे तर सचिवपदी ॲड. वैभव डांगे यांची निवड
उमरखेड : येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या वकील संघाच्या अध्यक्षपदी अॅड . संतोष आगलावे तर सचीवपदी वैभव डांगे बहुमताने विजयी झाले .
उमरखेड वकिल संघाच्या उमरखेड सन 2023 साठी झालेल्या अत्यंत प्रतिष्ठेच्या व चुरसी चे निवडणुकीत अध्यक्ष पदासाठी ॲड संतोष आगलावे यांना 71 मते मिळाली तर त्यांचे प्रतिस्पर्धी ॲड सुधीर कदम यांना 46 मते मिळाली . ॲड आगलावे यांनी 25 मतांनी दणदणीत विजय मिळविला सचिव पदासाठी झालेल्या निवडणुकीत ॲड वैभव डांगे यांना 82 मते मिळाली तर त्यांचे प्रतस्पर्धी अँड.मझर ,देशमुख यांना 37 मते मिळाली अँड. वैभव डांगे यांनी 45 मतांनी दणदणीत विजय मिळवला उपाध्यक्ष पदासाठी ॲड राजेश हनवते यांना 66मते तर ॲड ॲड विशाल कोत्तेवार यांना 52 मते पडलीअँड राजेश हणवते यांनी 14 मतांनी विजय मिळविला कोषाध्यक्ष पदासाठी ॲड कोमल पुरुषोत्तम बजाज यांना 72 मते मिळाली त्यांचे प्रतिस्पर्धी अँड.संजय पहुकर यांना 45 मते मिळाली अँड.कोमल बजाज यांनी 27 मतांनी विजय मिळविला विजया नंतर सर्व वकिलांनी विजयी जल्लोष साजरा केला . विजया वर प्रतिक्रिया देताना नवनिर्वाचित अध्यक्ष ॲड आगलावे यांनी उमरखेड येथे दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर स्थापनेसाठी पदनिर्मिती साठी मंजुरी मिळावी म्हणून शासस्तरावरून पाठपुरावा करणार तसेच अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय स्थापनेसाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ॲड. शंकर मुनेश्वर,सह निवडणूक निर्णय अधिकारी शशिकांत महामुने यांनी काम पाहिले तर या निवडणुकीसाठी अँड. प्रेमानंद माळवे.ॲड संतोष जैन, अँड.सुनील मुडे, अँड. राजेश्वर रायेवार अँड. विलास भागवत अँड. मनोज काळेश्वरकर अँड. रविकांत पांडे अँड बळीराम मुटकुळे अँड सुदर्शन घोडेकर अँड. संजय शिंदे. अँड. सुनील नाईक.अँड पुरुषोत्तम बजाज.अँड. जितेंद्र चाफळे.अँड. अन्सार . अँड म. रफी शेख. अँड. सलीम सौदागर अँड.गजेंद्र चंद्रे अँड. विठ्ठल गायकवाड.अँड. निरंजन पाईकराव अँड. गोकुळ कामठाणे.अँड राजू सुरोशे अँड. संजय डोळस अँड. निरंजन कदम अँड. पंजाबराव नवसागरे अँड जितेंद्र पवार,अँड.आशिष चौधरी यांचे सहकार्य लाभले .



