ठाणेदार सुजाता बनसोड ढाणकीतील अवैध धंद्यांवर नक्कीच लगाम कसणार ! नागरिकांत चर्चा.
ठाणेदार सुजाता बनसोड ढाणकीतील अवैध धंद्यांवर नक्कीच लगाम कसणार ! नागरिकांत चर्चा.
ढाणकी –
बिटरगाव पोलीस स्टेशनची निर्मिती झाली तेव्हापासून आजपर्यंत इथे महिला ठाणेदार कोणी आले नाही. पण यावेळी प्रथम महिला ठाणेदाराचा बहुमान सुजाता बनसोड यांच्या वाट्याला आला. याबरोबरच बिटरगाव पोलीस स्टेशनच्या पहिल्या महिला ठाणेदार म्हणून, त्यांचं नाव सुवर्ण अक्षरात लिहिल्या जाईल. सुजाता बनसोड यांची उमरखेड येथील कामगिरी सर्वश्रुत आहे. त्यामुळे त्यांनी बिटरगाव पोलीस स्टेशनचा चार्ज घेतल्यानंतर, ढाणकी शहरातील अवैध धंदेवाल्यांची झोपच उडाली आहे. आजपर्यंत ढाणकी शहरात अनेक अवैध धंदे मोठ्या प्रमाणात फोफावले असून, त्यावर ठाणेदार सुजाता बनसोड नक्कीच लगाम कसणार अशी विश्वास पूर्ण चर्चा ढाणकी शहरात नागरिक करताना दिसत आहेत.
ढाणकी शहरात खुलेआम चालणारा मटका, मोबाईल मटका, घरगुती जुगार व ढाणकी परिसरात आजूबाजूच्या शेतात चालणारे जुगार, ढाणकी परिसरात होणारी अवैध रेती तस्करी, ढाणकी परिसरात होणारी अवैध दारू वाहतूक, अवैध दारू विक्री,अवैध शिंदी विक्री,तसेच भर दिवसा व रात्री सुद्धा ढाणकी शहरातून होणारी अवैध देशी दारू वाहतूक, तसेच जुने बस स्टॉप ते प्राथ. आरोग्य केंद्रापर्यंत मुख्य रस्त्यावरील टू व्हीलर चे अतिक्रमण, अवैध प्रवासी वाहतूक, प्रत्येक पाईंट वरची खाजगी वाहनधारकांची दादागिरी या सर्व अवैध धंद्यांवर आता सुजाता बनसोड यांच्या येण्याने नक्कीच चाप बसणार. असा विश्वास जनता व्यक्त करीत आहे.