उपविभागीय अधिकारी डॉ व्यंकट राठोड यांना उत्कृष्ट उपजिल्हाधिकारी सम्मान तालुका दैनिक पत्रकार संघा तर्फे सत्कार.
उपविभागीय अधिकारी डॉ व्यंकट राठोड यांना उत्कृष्ट उपजिल्हाधिकारी सम्मान
तालुका दैनिक पत्रकार संघा तर्फे सत्कार
उमरखेड :- अमरावती विभागातील आणि यवतमाळ जिल्ह्यातील महसूल विभागात उत्कृष्ट उपजिल्हाधिकारी म्हणुन कार्य केल्या बद्दल उमरखेड येथील कार्यरत असलेले उपविभागीय अधिकारी डॉ व्यंकट राठोड यांना काल अमरावती येथे विभागीय आयुक्त निधी पांडे यांचे हस्ते गौरविण्यात आले.
या त्यांच्या उत्कृष्ट प्रशासकीय कार्याबद्दल उमरखेड तालुका दैनिक पत्रकार संघातर्फे त्यांचा शाल व पुष्पगुछ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी संघाचे अध्यक्ष विजय आडे, सचिव संतोष कलाने, अशोक गांजेगांवकर, दत्तात्रय देशमुख, राजु गायकवाड, दत्तात्रय काळे, भिमराव नगारे, प्रविण सूर्यवंशी उपस्थित होते