चाकूचा धाक दाखवून लुटणारा फरार आरोपी तब्बल ७ महिन्यानंतर जेरबंद – बिटरगाव पोलिसांची कारवाई.
चाकूचा धाक दाखवून लुटणारा फरार आरोपी तब्बल ७ महिन्यानंतर जेरबंद.
बिटरगाव पोलिसांची कारवाई.
ढाणकी / प्रतिनिधी :
जवळपास फेब्रुवारी महिण्यात टेंभुरधरा रोडवर चाकूचा धाक दाखवून जबरी चोरी करणारा, अपराध क्र. १५३/२०२३ कलम ३४१, ३९४, ३४ भादंवी मधील फरार आरोपी, राजु अर्जुन जाधव वय ३४ राहणार खडकी ता. हिमायतनगर जिल्हा नांदेड यास, गोपणिय माहीती नुसार मौजा खडकी बाजार ता. हिमायतनगर येथून, ताब्यात घेऊन सदर आरोपीस अटक करून बिटरगाव पोलिसांनी धडक कारवाई केली.
त्याच दिवशी दराटी पो.स्टे. सर्कल मध्ये सुध्दा, सदर आरोपीने अशीच चोरी केल्याची माहीती मिळाली.
अशा अट्टल गुन्हेगारावरील
सदर कारवाई डॉ. पवन बनसोड पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक पियुष जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाडवी यांचे मार्गदर्शनात, ठाणेदार सुजाता बनसोडे यांचे नेतृत्वात, पोलीस उपनिरीक्षक शिवाजी टिपुर्णे, मोहन चाटे, गजानन खरात, निलेश भालेराव, दत्ता कुसराम, मुंडे यांनी केली .