डॉक्टरांची करण्यात येत असलेली मानहानी तात्काळ थांबवावी डॉ. सारिका वानखेडे यांच्या समर्थनार्थ उमरखेड डॉक्टर्स असोसिएशनचे एसडीओंना निवेदन
डॉक्टरांची करण्यात येत असलेली मानहानी तात्काळ थांबवावी
डॉ. सारिका वानखेडे यांच्या समर्थनार्थ उमरखेड डॉक्टर्स असोसिएशनचे एसडीओंना निवेदन
उमरखेड : –
सन२०१९ मध्ये सिझर शस्त्रक्रियेमध्ये हलगर्जीपणा व निष्काळजीपणा केल्याचा आरोप करुन विडुळ येथील महिला सौ. धनश्री अनंता बिच्चेवार यांनी उमरखेड मधील सुखकर्ता हॉस्पीटलच्या डॉ. सारिका संदिप वानखेडे, डॉ. प्रिती पी. जयस्वाल, डॉ. श्रीकांत एस. जयस्वाल व मोरया हॉस्पीटलचे डॉ. शिवानंद कवाने यांच्या विरुध्द वरिष्ठांकडे तक्रारी केल्यानंतर समाधानकारक कार्यवाही न झाल्याने दि 12 ऑगस्ट रोजी उपविभागिय अधिकारी कार्यालया समोर आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला . सदर महिलेकडून संबंधित डॉक्टरांची व्यावसायिक व सामाजिक मानहानी होत असल्याने ती तत्काळ थांबवावी अशा आशयाचे निवेदन इंडियन मेडीकल व उमरखेड डॉक्टर्स असोसिएशनच्या वतीने उपविभागिय अधिकार्यांना देण्यात आले .
विडूळ येथील सौ धनश्री बिचेवार यांनी दि. २१ फेब्रुवारी २०२३ रोजी पोलिस स्टेशन, उमरखेड यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली होती. त्या तक्रारीच्या अनुषंगाने उमरखेड पोलिस स्टेशन च्या अधिकान्यांनी संबंधीत डॉक्टर व हॉस्पिटल ची प्राथमिक चौकशी केली मात्र डॉक्टरांवर पुढील कुठलीही कार्यवाही न झाल्याने सौ. धनश्री बिचेवार यांनी जिल्हाधिकारी, यवतमाळ यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली. सदरील प्रकरण वैद्यकिय क्षेत्राशी निगडीत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा शल्यचिकित्सक यांना तक्रारीची दखल घेऊन संबंधीत डॉक्टर व हॉस्पिटल यांची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या निदेशानुसार ग्रामिण रुग्नालय, उमरखेड येथील वैद्यकिय अधिक्षक डॉ. मांडन यांच्या अध्यक्षतेखाली ४. तज्ञांच्या टिमने सदरील प्रकरणामध्ये डॉ. सारिका वानखेडे, डॉ. प्रिती जयस्वाल, डॉ. श्रीकांत जयस्वाल व डॉ. शिवानंद कवाने यांची संपूर्ण चौकशी करुन मा. जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या मार्फत जिल्हाधिकारी यांना अहवाल सादर केला. या दरम्यान सौ. धनश्री बिच्चेवार यांनी पत्रकार परिषद घेऊन डॉ. सारिका संदिप वानखेड़े यांच्यावर गंभीर आरोप केले. मात्र काही दिवसांपूर्वी ग्रामीण रुग्नालय, उमरखेड यांच्यामार्फत करण्यात आलेला चौकशी अहवाल प्राप्त झाला असुन सदरील अहवालात डॉ. सारिका वानखेडे ,डॉ.प्रीती जयस्वाल ,डॉ. श्रीकांत जयस्वाल , डाँ. शिवानंद कवाने इतर सहकारी डॉक्टर यांना दोषमुक्तता देण्यात आली. तसेच सदरील चौकशी ग्रामीण रुग्नालय, उमरखेड येथील डॉक्टरांनी केल्यामुळे सौ. धनश्री बिच्छेवार यांनी तक्रारीमध्ये केलेल्या अक्षेपांची विस्तृत स्पस्टीकरण दिल्याचे डॉक्टर असोसिएशन ने दिलेल्या निवेदनामध्ये म्हटलेले आहे. तसेच तपास अहवालात डॉ. सारिका वानखेडे यांनी सौ. धनश्री यांच्यावर केलेल्या सिझर शस्त्रक्रीयेमध्ये कुठल्याही प्रकारचा हलगर्जीपणा अथवा निष्काळजीपणा केल्याचे दिसुन येत नाही. व धनश्री यांनी केलेल्या आरोपात तथ्य नसल्याचा निष्कर्ष अहवालात नमुद करण्यात आलेला आहे
असे असतांना जाणीवपूर्वक व्यवसायीक सामाजिक मानहानी करुन मानसिक त्रास देण्याच्या हेतूने सी. धनश्री यांनी डॉ. सारिका वानखेडे यांच्या विरुद्ध कार्यवाही करण्याची मागणी करुन दि. १२/०८/२०२३ पासुन उपोषण करण्याचा इशारा प्रशासनाला दिला. डॉ. सारिका वानखेडे यांनी संबंधीत तक्रारी संदर्भातील सर्व कायदेशिर प्रक्रिया पार पाडून सर्व चौकशीला समोर गेल्या आणि चौकशी अंती त्यांना दोषमुक्तता मिळाल्यानंतर देखील अशा प्रकारचा त्रास देणे मानहानी करणे योग्य नसुन यांची प्रशासनाने गंभीर दखल घ्यावी. अन्यथा अशा प्रकारांमुळे शहरातील आरोग्यसेवेवर व डॉक्टरांच्या मानसिकतेवर परिणाम होण्यास वाव आहे. त्यामुळे या प्रकरणाची प्रशासनाने तात्काळ गंभीर दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी उमरखेड डॉक्टर असोसिएशन ने उपविभागीय अधिकारी यांना निवेदनातून केली आहे. यावेळी इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ सुनिल बंग ,सचिव डॉ अरुण बंग , डॉ गजानन डोंगे डॉ. असोसिएशनचे अध्यक्ष डॉ . आशिष उगले , उपाध्यक्षा डॉ अर्चना रावते , सचिव डॉ.शिवानंद कवाणे , कोषाध्यक्ष डॉ गजानन हिंगमिरे डॉ.श्रीराम रावते डॉ.सारिका वानखेडे डॉ.श्रीकांत जयस्वाल डॉ.प्रीती जयस्वाल डॉ.मंगेश नरवाडे डॉ.मो. गौस डॉ.सचिन मामीडवार डॉ. गजानन येलुरे डॉ. श्रीराम रावते डॉ. फारुक आबरार डॉ. जागीरदार डॉ. नामदेव कदम डॉ.मनीष खंडेलवाल डॉ. राम नाईक डॉ. आशिष साखले डॉ.हस्तरकर डॉ. कुणाल काळे डॉ.श्रीराम शिंदे डॉ. सारिका देशमुख डॉ.वैशाली बंग डॉ. प्रिया काळे डॉ. रूपाली शिंदे डॉ. सोनाली बंग डॉ. ममता मामीडवार यांच्यासह अन्य शहरातील डॉक्टर मंडळींची उपस्थिती होती .
Righ noow iit sees liike Wordprrss iss thee top blogging
platform out there right now.(from what I’ve read) Is
tbat wat you’re using onn your blog?