धनगर आरक्षण उपोषणास पाठींबा – धनगर समाज युवा मल्हार सेना नांदेड.
धनगर आरक्षण उपोषणास पाठींबा – धनगर समाज युवा मल्हार सेना नांदेड
नांदेड(प्रतिनिधी) :
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मगावी दि 6 रोजी पासून धनगर समाज बांधवानी धनगर समाजाला ST प्रवर्गात समावुन घेत आरक्षणाची अंमलबजावणी करण्यासाठी अमरण उपोषणास नांदेड जिल्ह्यातील धनगर समाज युवा मल्हार सेनेच्या वतीने पाठींबा दर्शविण्यात आला आहे.
तसेच सोलापूर येथील धनगर समाज आरक्षण कृर्ती समितीच्या कार्यकर्त्यास मा राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या मारहाणीचा शासनाने दखल घ्यावी यासाठी निषेध व्यक्त करण्यात आला.त्यावेळी नांदेड पंचायत समितीचे सभापती बबनराव वाघमारे साहेब, सरचिटणीस धनगर समाज युवा मुल्हार सेनेचे महाराष्ट्रा राज्य मा.बालाजी पाटील नारे,अॅ ड मा.माणिकराव वाकरडे अॅड.प्रशांत कोकणे महाराष्ट्र प्रसिद्धीप्रमुख बालाजीराव काकडे नांदेड जिल्हा अध्यक्ष शिवाजीराव होळकर महिला जिल्हाध्यक्ष विमलताई पाटील जय मल्हार सेना ग्रामीण जिल्हाध्यक्ष पंढरीनाथ खोडे, विठ्ठलराव खोडे जिल्हाअध्यक्ष जय मल्हार सेना नांदेड शहरी धनगर समाज युवा मल्हार सेना जिल्ह्याचे सरचिटणीस नवनाथ काकडे मा.बामणे माधराव मा.श्याम काकडे मा.तुकाराम खरबे मा.दिगांबर केसराळे मा.योगेश पाटील व धनगर समाज बांधव आदींची उपस्थिती होती