आधी 3 तालुक्यांचा मराठवाड्याच्या जीआरमध्ये समाविष्ठ करा तरच उपोषण मागे मराठ्यांना सरसकट कुणबी आरक्षणासाठी 15 पासून साखळी उपोषणाचा निर्धार उपोषणकर्त्यांनी साधला पत्रकारांशी संवाद
आधी 3 तालुक्यांचा मराठवाड्याच्या जीआरमध्ये समाविष्ठ करा तरच उपोषण मागे
मराठ्यांना सरसकट कुणबी आरक्षणासाठी 15 पासून साखळी उपोषणाचा निर्धार
उपोषणकर्त्यांनी साधला पत्रकारांशी संवाद
उमरखेड : –
निजामकालिन नोंदीनुसार मराठवाड्याच्या 8 जिल्ह्यातील मराठ्यांना कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याच्या शासनाने काढलेल्या परिपत्रकात दुरुस्ती करून उमरखेड , महागाव, पुसद या मराठवाडा सिमेवरील विदर्भातील तालुक्यांचा समावेश करून तसा अध्यादेश जारी करावा तरच उपोषण मागे घेऊ अन्यथा पाणी व सलाईन सुद्धा घेणार नाही , त्याच प्रमाणे महाराष्ट्रातील मराठ्यांना सरसकट कुणबी जातीचे प्रमाणपत्र द्यावे यासाठी 15 सप्टेंबरपासून इतर मराठा बांधव साखळी उपोषणास बसणार असल्याची माहिती उपोषण मंडपात पत्रकारांशी संवाद साधताना उपोषणकर्त्यांनी दिली आहे .
मराठ्यांना सरसकट कुणबी जातीचे प्रमाणपत्र द्यावे व सराटी आंतरवाली येथे झालेल्या अमानुष पोलीस लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ उमरखेड तहसिल कार्यलयासमोर उपोषणास बसलेले गोपाल कलाणे यांना प्रकृती बिघडल्याने पुसद येथे रुग्णालयात भरती करण्यात आले . सचिन घाडगे ,सुदर्शन जाधव , शिवाजी पवार , शरद मगर यांच्या उपोषणाचा आज 10 वा दिवस असतांना आमदार नामदेव ससाणे , भाजपा जिल्हा समन्वयक नितीन भुतडा यांनी भेट देऊन उपोषण मागे घेण्याची विनंती केली, परंतु उपोषणकर्त्यांनी पत्रकारांसमोर आपली भुमिका मांडतांना महाराष्ट्रातील सर्व मराठा समाज बांधवांना सरकसकट कुणबी जातीचे आरक्षण मिळावे या जरांगे पाटलांच्या साखळी उपोषण आंदोलनाला पाठींबा देऊन आणखी काही समाज बांधव साखळी उपोषणास बसणार असल्याची माहिती देऊन, शासनाने निजामकालीन नोंदीनुसार मराठवाड्यातील 8 जिल्ह्यातील मराठ्यांना कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याचे परिपत्रक काढले त्या परिपत्रकात दुरुस्ती करून पुर्वीपासून मराठवाड्याशी संलग्न असलेल्या उमरखेड, महागाव, पुसद या तीन तालुक्यांचा समावेश करून तसे शुद्धीपत्रक काढून उपोषणस्थळी आणले तरच उपोषण उपोषण मागे घेऊ , चालढकल केल्यास उद्यापासून पाणी व सलाईन बंद करून आमरण उपोषण अधिक तिव्र करू असा इशारा यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना उपोषणकर्त्यांनी दिला यावेळी संदिप घाडगे, विजय हरडफकर , सरोज देशमुख ,अमोल पतिंगराव गणराज कदम यांच्यासह मराठा समाजबांधव उपोषणस्थळी हजर होते .
बाँक्स
मराठ्यांचा वारसा हा शिव शाहुंचा आहे आमचा संबंध निजामाशी नव्हता आणि नाही छत्रपती शाहु महाराजांनी सर्वात पहिले आरक्षण दिले . त्यामुळे शासनाने निजामाच्या नोंदी न तपासता छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती शाहु महाराज कोल्हापूर संस्थान यांचा अभ्यास करून सरसकट मराठा आरक्षण द्यावे
संदिप घाडगे समन्वयक मराठा क्रांती मोर्च