मरसुळ ग्राम पंचायत अंतर्गंत शासकीय निधीची अफरातफर ; चौकशी करा शेकडोवर नागरिकांची पंचायत समितीत धडक.
मरसुळ ग्राम पंचायत अंतर्गंत शासकीय निधीची अफरातफर ; चौकशी करा शेकडोवर नागरिकांची पंचायत समितीत धडक
पारदर्शक चौकशी न झाल्यास उपोषण आंदोलन करणार
२९ सप्टेंबर
उमरखेड –
मरसुळ गांवात १५ व्या वित आयोग निधी अंतर्गंत अनेक कामे दाखऊन प्रत्यक्षात मात्र कामेच नाहित अनेक कर वसुली पावत्या मध्ये खोडतोड करण्यात आली दलीत वस्तीत शासन नियमा प्रमाणे विकास कामे न करता नियमबाहय हा फंड इतरत्र वळता करुन सचिव – सरपंच तसेच त्यांचे सहकारी ग्राम पंचायत सदस्य यांनी संगनमताने शासकीय निधी विल्हेवाट लावली या सह दप्तरी राबविन्यात आलेल्या सर्वच कामाची सखोल चौकशी व्हावी म्हणून २७ सप्टेंबर रोजी या झालेल्या अफरातफर प्रकरणी २०० च्या वर यांच्या गैरकारभाराला गांवातील त्रासुन गेलेल्या नागरिकांनी गटविकास अधिकारी यांना धडक देऊन निवेदन दिले असल्याने ग्रामपंचायत कारभाराचा भंडाफोड होणार आहे या प्रकरणात वरिष्ठ स्तरावर निपक्षपाती चौकशी झाली नाही तर उपोषण आंदोलनाचा मार्ग अवलंबा लागेल असे म्हटले आहे
घरकुल लाभाची यादी ग्राम पंचायतने शासन नियमानुसार न करता अर्थिक देवान घेवानं करुन ग्राम पंचायत सदस्यांनी या अगोदर नातेवाईकांच्या नांवे लाभ घेतला असतांना हि बळाचा वापर करून परत आपल्याच कुंटुबातील व्यक्ती च्या नांवे घेऊन निधी लाटला , लाभार्थी निवडी चे दप्तर उपलब्ध नाही असे सचिवांने मागणी केली असतांना नागरिकांना लिहुन दिले असून चालु आर्थिक वर्षात विकास कामाचे मागणी अंदाजपत्रक बनविले नाही , ग्राम पंचायती ची संपती गांवातील खासगी व्यापाऱ्यांना भाडेपट्या वर देऊन शासनाचा नियम भंग केला असुन ग्राम पंचायत खोल्यामध्ये ईतर नागरिकांना राहण्यास जागा दिली , एप्रील पासुन गृहकर आकारणी – पाणी पुरवठा आकारणी दप्तर नोंद न ठेवता या सह वसुली गोषवारा नाही , कर वसुली व इतर ग्राम पंचायत वसुली संयुक्त बँक खाते मध्ये जमा केल्या जात नाही , कर वसुली पावत्या खोडतोड आहेत , वित आयोग निधी मधून दोन वर्षा पुर्वी पाणी शुद्धीकरण फिल्टर प्लांन्ट कार्यान्वीत सुविधा नसतांना त्यावरील खर्च दप्तरी दाखऊन निधी उचलुन अफरातफर करण्यात आला , सार्वजनिक शौचालय दुरुस्ती – रंगोटी कामे , पुल दुरुस्ती , श्रीदतनगर शाळा रंगोटी सह अनेक कामे ग्राम पंचायत सदस्यांनी वाटाघाटी करून स्वतः च ठेके घेऊन थातूर मातूर कामे केली व रक्कमा हडपल्या , गांवातील हातपंप बंद ठेवून त्यावर दुरुस्ती न करता खर्च दाखविला जाणीव पुर्वक बंद ठेवलेत ग्राम पंचायत कडे जागा उपलब्ध असतांना अतिरिक्त नविन मंजुर अंगनवाडी ईमारत – हवामान केंन्द्र राबविन्या साठी टाळाटाळ केल्या जाते , जल जिवन मिशन अंतर्गंत बोगस कामे सुरु आहेत त्यांची चौकशी व्हावी , गांवातील काही जनांनी रस्त्याच्या कडेला असलेल्या पाईप लाईन वरील जागेत शेन – घाण कचरा उकंडे तयार केल्याने नागरिकांना घाण साचलेले पाणी दृषीत होऊन मलेरीया – डेंग्यू आजार होऊन दृषीत पाणी पिल्याने किडन्या चे आजार वाढलेत , गांवातील तुटलेल्या पुलांच्या दुरुस्त्या केल्या नसुन , नाल्या साफसफाई नसल्याने दुगंधी निर्माण होऊन नागरिकांचे आरोग्य जीवनमान धोक्यात आले आहे , जिल्हा परिषद २२ – २३ वितीय वर्षातील दलात वस्ती विज काम , सौरदिवे खुल्या वस्तीत बसविले त्याचे बिल स्थगित करावे , ह्या सह विविध प्रकारे मुद्दे मांडुन रितसर निवेदन गटविकास अधिकारी यांना देण्यात आले आहे
मरसुळ गांव विकासाची कामे गैरमार्गाने सुरु आहेत ह्या ठिकाणी ग्राम पंचायत जागेत अंगनवाडी मुलांना मोठ्या प्रमाणात कोचून कोंबून एकाच वर्ग खोलीत शिकविल्या जाते तेव्हा नविन ईमारतीचे काम सुरु करावे व ग्रा प कडिल जागा भाड्याने दिलेल्या प्रकरणी चौकशी व्हावी अशी मागणी लक्ष्मण बेंडके यांच्या सह शेकडोवर मरसुळ गांवातील नागरिकांनी केली.