राज्य व केंद्र शासनाच्या धोरणाविरुद्ध तहसील कार्यालय समोर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे एक दिवसीय धरणे.

youtube

राज्य व केंद्र शासनाच्या धोरणाविरुद्ध तहसील कार्यालय समोर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे एक दिवसीय धरणे

 

प्रतिनिधी
उमरखेड :
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उमरखेड शरद पवार गटाच्या वतीन उमरखेड तहसील समोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले .या धरणे आंदोलनात राज्य व केंद्र सरकारच्या तुघलकी निर्णयामुळे जनता हैराण झाली असून सरसकट कंत्राटी सरकारी नोकर भरती घेतलेला निर्णय सरकारने तात्काळ मागे घ्यावा ,ग्रामीण भागाचा शिक्षणाचा गाभा असणाऱ्या जिल्हा परिषद शाळांना दत्तक देण्याचा बहाण्यातून जिल्हा परिषद शाळांचे करण्यात येत असलेले खाजगीकरणाचा निर्णय मागे घेण्यात यावा ,शासनाच्या आरोग्यविषयक उदासीन धोरणामुळे राज्यात मोडकळीस आलेली आरोग्य यंत्रणेला मुबलक सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्या, मागील काही दिवसात राज्यातील सरकारी दवाखान्यांमध्ये झालेल्या रुग्णांच्या मृत्यूची चौकशी करून आरोग्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा उमरखेड शहरातील उपजिल्हा रुग्णालयाची १०० घाटाची मागील एक वर्षापासून तयार असलेली इमारत तात्काळ रुग्णांच्या सेवेत देण्यात यावी उमरखेड तालुक्याचा पिक विमा योजनेत समावेश करून शेतकऱ्यांना सरसकट पीक विमा देण्यात यावा शहरासह तथा ग्रामीण भागाच्या रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून सर्व त्यांची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी अशा विविध मागण्यांच्या अनुषंगाने सरकारचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे एक दिवशी लाक्षणिक आदरणीय आंदोलन करीत असून या भावना तात्काळ शासनातर्फे दखल घेऊन पूर्ण कराव्या अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला असे निवेदन तहसिलदार यांना देण्यात आले या वेळी पुरोगामी युवा ब्रिगेडने आणि महाविकास आघाडी चे घटक शिवसेना उबाटा गट यांनी मागण्या सुंदर्भात जाहीर पाठींबा देण्यात आला
या धरने आंदोलनात राजुभैय्या जयस्वाल , राजुभेच्या जयस्वाल ,स्वप्नील कनवाळे प्रदीप देवसरकर वर्षाताई निकम , नलीनी ठाकरे, साजीद जहागीरदार, भास्कर पडांगळे दत्ता गंगासागर साहेब,सतिश नाईक, अरविन्द भोयर, प्रशांन्त पत्तेवार स्वाती पाचकोरे संजय देवसरकर, अँड मुटकुळे, तानाजी चंद्रवंशी, शाहरुख पठाण, गणेश शिंदे सुर्यकांन्त पंडीत , अँड सौदागर.आशा देवसरकर, भाग्यश्री शिंदे भावना लगळे, सौदागर, राजेश कवाने,प्रदीप राव देवसरकर ,सुभाष जाधव इत्यादी असंख्य कार्यकते हजर होते

Google Ad
Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!