बोरगाव येथे भव्य शंकर पट.
बोरगाव येथे भव्य शंकर पट
उमरखेड –
उमरखेड तालुक्यातील बोरगाव येथे समस्त गावकरी मंडळी यांच्या वतीने भव्य शंकर पटाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे उद्घाटक रामरावजी वडकुते हिंगोली लोकसभा प्रभारी व निवडणूक प्रमुख यांच्या उपस्थित संपन्न झाले.
बैलजोडीच्या या शर्यतीमध्ये पंचकोशीतील नामांकित बैल जोड्यांनी सहभाग नोंदविला होता.
अनेक बैल जोडी प्रेमींनी आपल्या बैल जोड्या सह या भव्य शंकर पटांमध्ये आपला सहभाग नोंदविला
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून रामरावजी वडकुते उपस्थित होते तसेच भाविक भगत ,भैय्या पाटील ,बाळासाहेब चंद्रे पाटील पंकज मुडे ,बबलु जाधव दत्तराव नप्ते,लक्ष्मण नप्ते ,प्रेमराव आढाव सरपंच बोरगाव . कुष्णा इमले उपसरपंच बोरगांव यांच्या सह मोठ्या प्रमाणात गावकरी मंडळी उपस्थित होते.