मोटर सायकल आडवी लावुन चाकुच्या धाकावर प्रवास कर्त्यांना लुटले ; अज्ञातांनी मारहान करुन प्रवाशा जवळील सोने – मोबाईल ऐवज हिसकावला. 

youtube

मोटर सायकल आडवी लावुन चाकुच्या धाकावर प्रवास कर्त्यांना लुटले ; अज्ञातांनी मारहान करुन प्रवाशा जवळील सोने – मोबाईल ऐवज हिसकावला.

उमरखेड –
सुरक्षितपणे कारने ढाणकी या गांवी जात असतांना उमरखेड – ढाणकी रस्त्यावर हरदडा जवळील स्वामी विवेकानंद इंग्रजी माध्यमांच्या शाळेजवळ चौंघा जनांनी अचानक समोर येऊन दुचाकी आडवी लावली आणि वाहनात बसुन असलेल्या प्रवासकर्त्या दोघा जना सह वाहन चालकास मारहान केली , चाकु च्या धाकावर जवळील सोने – मोबाईल एक लाखाच्या वर रुपयाचे ऐवज चोरट्यांनी चोरुन नेऊन घटना घडवून स्थाळावरुन पोबारा केला , हि घटना १९ ऑक्टोंबर रोजी रात्री च्या ९ : ४५ वाजता च्या सुमारास घडली , सनासुदीचे दिवस काळात रस्त्यात आडवून लुटपाट च्या घटना या रस्त्यावर वाढल्याने प्रवाशा मध्ये कमालीची दहशत निर्माण झाली आहे
सविस्तर माहिती अशी की , गायकवाड कुटूंब कौंटुबिक काम आटोपून ढाणकी गांवाकडे जात होते प्रवासकर्ते लक्ष्मीकांत गायकवाड ( २३ ) , आणि अन्नपुर्णा धुळे हे एम एच २५ टि ३९४ क्रमांक वाहनाने उमरखेड वरून त्यांच्या ढाणकी या गांवी रात्रीला निघाले असता हरदडा बस थांब्या नजीक च्या स्वामी विवेकानंद स्कुल जवळील वळणावर दुचाकी आडवी लावून चौंघा अज्ञातांनी मारहान करून जवळील दोन तोळे एक लाखांच्या वर किंमतीचे सोने – मोबाईल ऐवज हिसकावुन घेऊन वाहनाचे काचा फोडुन घटना घडविली हि आप बीती प्रवास कर्त्यांनी उपस्थित या घटने संबधाने पत्रकांरांना माहिती देत सांगीतले यावर नं थांबता चालक शुभम हामंद रा चातारी यांच्या वाहनाची चावी घेऊन घटना स्थळावरून लुटारु पसार होण्यास यशस्वी झाले
ढाणकी महाकाली देवस्थान प्रमुख लक्ष्मीकांत गायकवाड ( २३ ) रा ढाणकी यांनी या घटने बाबत पोलीसांत रितसर २० ऑक्टोंबर रोजी स्वत : उपस्थित राहुन फिर्याद दाखल केली आहे , उमरखेड ठाणेदार शंकर पांचाळ यांनी या गुन्ह्यांची गंभीरतेने दखल घेऊन अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया तपास कार्यातुन सुरु ठेवले आहे
या घटने बाबत पुढील तपास उमरखेड सहाय्यक पोलीस निरिक्षक भरत चपाईतकर अधिकारी या घटने बाबत हे अधिक तपास करित त्या अज्ञात आरोपी पकडण्याच्या शोध मोहिम राबवित आहेत
रस्ता प्रवास करित असतांना चोरटे या प्रकारचे गंभीर गुन्हे घडवीत असल्याने पोलीसांची रात्री रस्ता गस्त वेळ रात्री ११ वाजेपर्यत सुरु ठेवणे अंत्यत प्रवासकर्त्याच्या सुरक्षिते ते साठी अंत्यत महत्वाचे ठरत आहे.

Google Ad
Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!