पुरोगामी युवा ब्रिगेड चा चतुर्थ वर्धापन दिन उत्साहात साजरा समाजभूषण पुरस्कारांचे झाले वितरण.
पुरोगामी युवा ब्रिगेड चा चतुर्थ वर्धापन दिन उत्साहात साजरा
समाजभूषण पुरस्कारांचे झाले वितरण
उमरखेड/ प्रतिनिधी: पुरोगामी युवा ब्रिगेड चा चतुर्थ वर्धापन दिन काल उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी तालुक्यातील ९ व्यक्ती व संस्थांना समाजभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले.
तालुक्यातील जागृत संघटना म्हणून ज्या संघटनेची ओळख आहे अश्या पुरोगामी युवा ब्रिगेड चा वर्धापन दिन काल सोमवार रोजी श्रीराम मंगल कार्यालयात अनेक मान्यवर व तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तातू भाऊ देशमुख, तर उद्घाटक राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षा वर्षाताई निकम तर प्रमुख पाहुणे म्हणून राम भाऊ देवसरकर, गोपाल अग्रवाल, साहेबराव कांबळे,राष्ट्रवादीच्या महीला जिल्हा अध्यक्षा प्रा.नलिनी ठाकरे, स्वप्नील कनवाळे, छायाताई धुळध्वज, ॲड. वसीम अहमद, प्रमोद राठोड , विष्णू वाढेकर आदी उपस्थित होते.
तसेच दरवर्षी दिला जाणारा प्रतिष्ठेचा समाजभूषण पुरस्कार २०२३ चे वितरण सुद्धा यावेळी झाले असून यामध्ये तालुक्यातील सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्या ९ व्यक्ती व संस्थांची निवड यात करण्यात आली होती. यामध्ये औदुंबर ज्येष्ठ नागरीक मंडळ, उमरखेड ,
माधुरी उत्तमराव दळवी ( प्रभाग समनव्यक, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान पंचायत समिती उमरखेड), ॲड. अरमान अंबेजोगाईकर, मूर्तिकार बंडू भुते, पत्रकार डॉ अविनाश खंदारे, पत्रकार व्यंकटेश पेन्शनवार, यवतमाळ येथील युवा कलाकार निशांत सिडाम, हदगाव येथील प्रयोगशील शिक्षक बालाजी सादुलवार सर, पोलिस कर्मचारी संतोष राठोड आदींना समाजभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले . तर यासह काही व्यक्ती व संस्थांचा विशेष सत्कार करण्यात आले. यामध्ये आई एकवीरा कार्डीअक अँब्युलन्स चे पावर बंधू, पोलीस मित्र संघटना, संगणक परिचालक संघटना, भाविक भगत हेल्प फाउंडेशन, तामसा येथील भीम सावली बहुउद्देशीय संस्था, ईल्म हासिल करो ऑर्गनायझेशन , विडुळ येथील आशिष धुळे, जहीर भाई मित्र मंडळ पोफाळी, चातारी चे ज्ञानसाधना अकॅडमी चे संचालक माधव पीन्नलवाड , अजिंठा आर्ट चे गजानन वानखेडे व नुरी कमिटी मुळावा आदी संस्थांना विशेष सन्मान देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमात मोठया संख्येने सामाजिक कार्यकर्ते व तालुक्यातील युवक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रवक्ता शाहरूख पठाण यांनी केले , संचलन कृष्णा शेळके तर आभारप्रदर्शन पंकज दीपके यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पुरोगामी युवा ब्रिगेडच्या सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.