पोफाळी येथे काकड आरतीची सांगता अबांदास धुळे मित्रमंडळा कडुन वारकर्यांचा शेला – टोपी देऊन सत्कार –
पोफाळी येथे काकड आरतीची सांगता
अबांदास धुळे मित्रमंडळा कडुन वारकर्यांचा शेला – टोपी देऊन सत्कार –
पोफाळी :-
कार्तीक महिन्यात म्हणजे दिवाळीच्या बलिप्रतिपदा या दिवसापासुन कार्तीक महीन्याच्या पौर्णीमे पर्यत चालणार्या उत्सवाची सांगता आज दुपारी गजानान महाराज मंदिरातुन हनुमान मंदिरा व महादेव मंदिर मध्ये सांगता झाली पोफाळीतील वारकरी मंडळी सुर्यनारायणा उगवण्याआधीच गावातील भजनी व युवक मंडळ हनुमान मंदीरामध्ये जमतात. तेथुन गावातील मुख्य रस्ताने टाळमृदंगाच्या गजरात हरिभजनाने तल्लीन होवुन भारूड,अंभग,भजन, भक्तीमय गीते आदीचे गायन करून मधुर स्वरात ईश्वराला आर्तहाक घालत कार्तिक महिन्यातील पंधरा दिवस भक्तीमय करुन टाकत असतात .त्याच भक्तीमय उत्साहाचा समारोपीय कार्यक्रमा मध्ये कार्तिकी दिंडी समाप्ती सोहळा निमित्त शेला नारळ देऊन सर्व भजनी मंडळ यांना अंबादास धुळे मित्र मंडळच्या वतीने स्तकार करण्यात आला. यावेळी मा. सरपंच सदाशिव ढोरे, सतीश शिलार ,प्रसाद पतंगराव ,दत्तराव जरंडे ,संतोष ठाकरे ,वसंत कुमकर, विनोद शिलार डॉ रवी कलाने, अभय बरडे ,शिवा हुडेकर धीरज मगर श्रेयश कोंडुरकर गणेश खराटे मनोहर कठाळे, रामराव काकडे, गजानन ठाकरे, रामराव ढोरे, शिवाजी ढोरे ,भीमराव मेंढे, नारायण हुडेकर ,अजय कल गुंडे, पंडित बचने ,विशाल परमोड, गणेश लष्कर, सौरभ मांगुळकर, इत्यादी भंजनी मंडळी उपस्थीत होते.