महात्मा फुले यांच्या स्मृतीदिना निमित्त गौरव कृती समितीचे कडुन 13 व्यक्तीना सत्यशोधक भाऊसाहेब माने समाजभूषण पुरस्काराने सन्माणित.
महात्मा फुले यांच्या स्मृतीदिना निमित्त गौरव कृती समितीचे कडुन 13 व्यक्तीना सत्यशोधक भाऊसाहेब माने समाजभूषण पुरस्काराने सन्माणित
प्रतिनिधी
उमरखेड : तालुक्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा व सामाजिक संस्थेचा भाऊसाहेब माने गौरव कृती समितीतर्फे सत्यशोधक भाऊसाहेब माने समाज भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले .जिजाऊ सांस्कृतिक भवन येथे २८ नोव्हेंबर 2023 रोजी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त या कार्यक्रमाचा आयोजन केलं होतं त्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कृषी महाविद्यालयाचे चेअरमन डॉ . विजयराव माने होते तर उद्घाटक म्हणून श्रीकांत देशमुख माजी अप्पर आयुक्त तथा साखर संचालक महाराष्ट्र राज्य हे होते विचारपीठावर नितिन माहेश्वरी, नितीन भुतडा ,डॉ . वि .ना . कदम ,डॉ अजय नरवाडे , रवि शिलार, किशोर ठाकुर, ऋतिक वानखेडे ,देवानंद मोरे श्री क्षिरसागर हजर होते
सत्यशोधक समाज स्थापनेला यावर्षी २४ सप्टेंबर रोजी १५० वर्षे पूर्ण होण्याच्या आणि महात्मा ज्योतिराव फुले यांच्या स्मृति दिवसानिमित्त दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भाऊसाहेब माने गौरव कृती समितीने सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना आणि संस्थेचा सत्यशोधक भाऊसाहेब माने समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी स्व. जेठमलजी माहेश्वरी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ नारायणराव वानखेडे सर (शिक्षण क्षेत्र ) स्व. नारायणराव पाटील वानखेडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ बापूराव माने (जीवनगौरव )स्व . रामचंद्र शिंगणकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ . मुव्हमेंन्ट फॉर पीस अँड जस्टिस (सामाजिक संस्था )स्वर्गीय बंकटलाल भुतडा यांच्या स्मृतिप्रित्यर्थ श्री नामदेवराव पतंगे (उद्योजक ) स्व.परसराम पिलवंड यांच्या स्मृतीप्रित्यर्थ डॉ .वि .ना .कदम (साहित्य झाड आणि झेंडा आत्मचरित्र ) स्व. हाजी अमानुल्ला जहागीरदार यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ बजरंग पवार ( दिव्यांग ) स्व.वामनरावजी उत्तरवार यांच्या स्मृतिप्रित्यर्थ शैलेश ताजवे (उत्कृष्ट लेखन पत्रकारिता ) स्वर्गीय केशवराव देवसरकर यांच्या स्मृति पित्यर्थ मेजर विलासराव वानखेडे ( माजी सैनिक ) स्व. नारायणराव शिलार मामा यांच्या स्मृतिपित्यर्थ आशाताई विक्रम कलाने (महिला सशक्तिकरण ) स्वर्गीय सखारामजी नरवाडे गुरुजी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ मोहम्मद अरिफ मोहम्मद रियाज ( प्रशासकीय सेवा ) स्वर्गीय सखारामजी मुंडे गुरुजी यांच्या स्मृतिपत्यार्थ शरद टोमके एसटी चालक (सामाजिक सेवा ) नानासाहेब देशमुख यांच्या स्मृतिपत्यार्थ प्रवीण कदम चालगणी (उत्कृष्ट कास्तकार ) गुलाबसिंग ठाकूर यांच्या स्मृती पित्यर्थ बबलू जाधव ( लोक -प्रशासकीय दुवा )यांना जिजाऊ भवन येथे गौरव व स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आले या वेळी प्रतिमेस पुष्पहार आणि दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरवात झाली
या भागात को .गोविंद पानसरे यांचे आजोबा श्री नारायण उर्फ नारो बाबाजी पानसरे महाधट यांती २० व्या शतकाच्या प्रारंभी सत्यशोधक समाज चळवळ वाढविली ज्यामुळे उमरखेड परिसरातील चातारी, पळशी, बेलखेड, कुपटी ,सुकळी ,करंजी अशा अनेक गावागावात प्रसार करून कार्यकर्ते घडविण्याचे त्यांनी सांगितले हीच प्रेरणा घेऊन भाऊसाहेब माने यांनी व सहकाऱ्यांनी या भागात १९५०_५५ च्या दरम्यान ग्रामीण भागात शिक्षण आणि वस्तीगृह सुरू करून शिक्षणाची सुविधा त्याकाळी निर्माण केल्याचे अध्यक्षस्थानावरून . डॉ . विजयराव माने यांनी सांगिलतले
यावेळी डॉ . वि . ना . कदम, आशा कलाने यांनी सत्काराला उत्तर दिले
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाऊसाहेब माने गौरव कृती समितीचे अध्यक्ष प्रवीण सूर्यवंशी संचलन सुनील वानखेडे तर आभार उद्धव गायकवाड आपला जीन प्रेस संचालक यांनी केले कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात महीला नागरिक उपस्थित होते
चौकट :
सत्यशोधक समाज स्थापनेला यावर्षी १५० वर्षे पूर्ण होत असताना महात्मा फुले यांच्या विचार रुपी फुले वेचून वर्तमान काळात वंचित शेतकऱ्याची जमेल तशी सेवा करून त्यांना त्यांची फळे द्यावीत
डॉ . विजयराव माने
चेअरमन कृषी महाविद्यालय