प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी मंत्रालयासमोर सरकारला देणार अवयव फ्रीप्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी मंत्रालयासमोर सरकारला देणार अवयव फ्री
प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी मंत्रालयासमोर सरकारला देणार अवयव फ्री
हिंगोली –
हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मागील दोन वर्षापासून पिक विमा क्लेम पासून वंचित ठेवले तसेच सोयाबीनचा आता तोंडाशी आलेला घास पावसाने व येलो मोजेक मुळे हिरावून गेला त्यानंतर शेतकऱ्याने कसेबसे कर्ज काढून पेरणी केली असता मागील दोन-तीन दिवसापासून अतिवृष्टी चालू असल्यामुळे तुरीचे पीक पूर्णपणे नष्ट झाल्याचे दिसून येत आहे व पेरणी केलेले पीकही अतिवृष्टीमुळे संपले असे एका मागून एक नैसर्गिक व सरकारी जुलमी शेतकऱ्यावर संकट येत असून त्यावर सरकार कुठल्याही प्रकारचे पाऊल उचलत नाही प्रशासन फक्त बघायची भूमिका घेत असल्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील गोरेगाव परिसरातील शेतकऱ्यांनी स्वतःचे अवयवाचे दर निश्चित करून विक्रीसाठी काढले परंतु सरकार घ्यायला तयार नाही आणि शेतकऱ्याला मदत करायलाही तयार नाही त्या अनुषंगाने प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाप्रमुख रवि उर्फ राॅबट बांगर,जि.संघटक विलास आघाव,युवा जिल्हाप्रमुख अमोल खिल्लारी पाटील तसेच इतर पदाधिकारी हे दि.04/12/2023 रोजी मंत्रालयासमोर सरकारला मोफत अवयव विक्री आंदोलन करणार आहे यासाठीचे निवेदन हिंगोली जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना व जिल्हा कृषी अधिकारी यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन देण्यात आले यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाप्रमुख रवि उर्फ राॅबट बांगर,जि.संघटक विलास आघाव,युवा जिल्हाप्रमुख अमोल खिल्लारी पाटील तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते