पदाचा दुरुपयोग, गैरवर्तणुक व कर्तव्यात कसूर केल्या प्रकरणी ब्राम्हणगांवचे सरपंच परमात्मा गरुडे अपात्र घोषित अप्पर आयुक्त अमरावती यांचे आदेश विरोधी गटनेते शेख खदीर यांची पत्रकार परिषदेत माहिती उमरखेड : –
पदाचा दुरुपयोग, गैरवर्तणुक व कर्तव्यात कसूर केल्या प्रकरणी
ब्राम्हणगांवचे सरपंच परमात्मा गरुडे अपात्र घोषित
अप्पर आयुक्त अमरावती यांचे आदेश
विरोधी गटनेते शेख खदीर यांची पत्रकार परिषदेत माहिती
उमरखेड : –
ब्राम्हणगाव येथील सरपंच परमात्मा गरुडे यांनी त्यांच्या पदाचा दुरुपयोग तथा गैरवर्तणुक व कर्तव्यात कसुर केल्याचे स्पष्टपणे दिसून येत असल्यामुळे त्यांना महाराष्ट्र ग्राम पंचायत अधिनियम 1959 चे कलम 39 (1) मधील तरतुदीनुसार राजेन्द्र बावणे अप्पर आयुक्त अमरावती यांनी सरपंच तथा सदस्य ग्रामपंचायत ब्राम्हणगाव या पदाकरिता दि . 30 नोव्हेंबर रोजी दिलेल्या आदेशात अपात्र घोषित केले असल्याची माहिती ब्राम्हणगाव ग्रा.पं चे विरोधी गटनेते शेख खदीर शेख हानिफ यांनी स्थानिक विश्रामगृह येथे बोलाविलेल्या पत्रकार परिषदेतून दिली आहे .
ब्राम्हणगांव ग्राम पंचायतचे सरपंच परमात्मा गरुडे हे विविध प्रकरणांमध्ये पदाचा दुरुपयोग तथा गैरवर्तणूक व कर्तव्यात कसूर करीत ग्रा पं . अंतर्गत विविध मालमत्ता संबंधी मनमानी कारभार करीत असल्याने त्यांचे विरुद्ध महाराष्ट्र ग्राम पंचायत अधिनियम 1959 चे कलम 39 (1) मधील तरतुदीनुसार सरपंच तथा सदस्य पद अपात्र घोषित करावे अशी तक्रार विभागिय अपर आयुक्त अमरावती यांचेकडे यांचेकडे न्यायप्रविष्ठ केली होती . त्या अनुषंगाने अप्पर आयुक्त यांनी यवतमाळ जि.प चे तत्कालिन मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांना चौकशीचे आदेश दिले त्यानंतर उमरखेड पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी गजानन पिल्लेवाड व विस्तार अधिकारी पांडुरंग माने यांनी या संबंधाने प्राथमिक चौकशी करून जि.प चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेकडे अहवाल सादर केला . त्यानंतर जि.प . मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी प्रकरणाची सत्यता पडताळून अपर आयुक्त यांचेकडे आपला अहवाल सादर केला होता . या चौकशी अहवालात ब्राम्हणगाव येथील सरपंच व सचिव यांनी गाव नमुना 8 ला आनंदराव हटकरे यांचे नावाची नोंद घेतली होती सदर घेतलेल्या नोंदी मध्ये कोणताही फेरफार घ्यावयाचा असल्यास त्याबाबत मासिक सभेमध्ये ठराव पारित करून सचिव यांनी नमुना 8 मध्ये दूरुस्ती करणे अवश्यक असतांना आनंदराव हटकरे यांच्या नावाला गोल करून गौतम लोणे यांची मालक म्हणून नोंद घेतली व नोंद घेतल्या बाबत स्वाक्षरी केली त्यामुळे पदाचा दुरुपयोग झाला . मालमत्ता क्र . 438 मोरेश्वर देशपांडे यांचे नावाने असलेल्या जागेपैकी 15 50 चौ फुट जागा सुमन दुगमवाड यांना नोटरी व्दारे सौदाचिठ्ठी केलेली असतांना त्या आधारे नातेसंबंध जोपासत सौदा चिठ्ठीवर फेरफार नोंदवून शासनाचा महसुल बुडवून पदाचा दुरुपयोग केला . चुन्नुशा जुम्माशा यांच्या जागे बाबत ही आखीव पत्रिकेमधील क्षेत्रफळाची खातरजमा करून नोंद करणे आवश्यक असतांना क्षेत्रफळात खोडतोड केली . अरविंद धबडगे यांच्या 24 प्लॉट खरेदी प्रकरणात बेकायदेशीर अकृषक लॉटच्या नोंदीबाबत गटविकास अधिकारी ग्रा.पं.सचिव हे दोषी असल्याचे आदेशात म्हटले आहे . सदर प्रकरणी संबंधित पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रविणकुमार वानखेडे , सचिव प्रकाश राठोड हे दोषी असल्यामुळे त्यांचे विरुद्ध जिल्हा परिषद स्तरावर प्रशासकिय कार्यवाही करण्यात येत असल्याचा अहवाल अपर आयुक्तांकडे सादर करण्यात आला . दस्तऐवज व परिस्थिती विचार करता अपर आयुक्त गजेन्द्र बावणे यांनी सरपंच परमात्मा गरुडे यांना सरपंच तथा सदस्य पदासाठी अपात्र घोषित केल्याचे ग्रा.पं . विरोधी गटनेते शेख खदीर यांनी पत्रपरिषदेत म्हटले आहे .
” चौकट “
संबंधित सर्व प्रकरणांमध्ये 2 तत्कालिन सचिव व विद्यमान सचिव प्रकाश राठोड तसेच पं स चे विद्यमान गटविकास अधिकारी यांचे विरुद्ध तत्कालिन सीईओ श्रीकृष्ण पांचाळ यांनी कोणती कार्यवाही केली याबाबत लवकरच पाठपुरावा करून सर्व संबंधित अधिकाऱ्यां विरुद्ध प्रसंगी न्यायालयात दाद मागणार
शेख खदीर शेख हानिफ
विरोधी गटनेते ग्रा पं . ब्राम्हणगाव