अन्न व औषध प्रशासनाची उमरखेड येथे धडक कारवाई एक लाख तेवीस हजाराचा पान मसाला जप्त : उमरखेड
अन्न व औषध प्रशासनाची उमरखेड येथे धडक कारवाई
एक लाख तेवीस हजाराचा पान मसाला जप्त :
उमरखेड प्रतिनिधी .
अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने तालुक्यातील मारलेगाव येथे प्रतिबंधित सुगंधित गुटक्यावर मोठे कारवाई करण्यात आली आहे .
प्रतिबंधित असलेला तंबाखूजन्य पानमसाला सुगंधित तंबाखू जप्त करण्यात आला .सुगंधी तंबाखूचा सुमारे एक लाख 23 हजार रुपयांचा किमतीचा साठा जप्त करण्यात आला असून एकाच अटक झाल्याने गुटखा तस्करी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे .
.तालुक्यातील मारलेगाव येथे राजरोसपणे गुटख्याची अवैध विक्री होत असल्याची गोपनीय माहिती अन्न व प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्याला मिळाली असती मिळाली असता यवतमाळ येथील अधिकाऱ्यांचा ताफा मारलेगाव येथे दुपारी एक वाजताच्या सुमारास गुटखा विक्री करणारा सचिन शिंदे वय 30 वर्ष राहणार मारले गाव हे आपल्या घरासमोरील जनावरांच्या गोठ्यातून प्रतिबंधित असलेला तंबाखूजन्य गुटखा विक्री करत असल्याचे अधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले व अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी गुटखा विक्री करणाऱ्यांना रंगेहात पकडून एक लाख 23 हजार रुपयांचा प्रतिबंधित तंबाखूजन्य पानमसाला ताब्यात घेतला आहे पुढील कारवाई अन्य व औषध विभागाचे अन्नपुरवठा अधिकारी अन्नसुरक्षा अधिकारी यवतमाळ अमित कुमार उपलप करीत आहे