स्नेहा गोल्ड कंपनी शेतकऱ्यांचे जिवनमान उंचावणारे ठरणार सोयाबीन प्रक्रिया उद्योग.
स्नेहा गोल्ड कंपनी शेतकऱ्यांचे जिवनमान उंचावणारे ठरणार सोयाबीन प्रक्रिया उद्योग
उमरखेड :- जवळपास ५७ एकर च्या जागेत तयार होत असलेल्या ढाणकी जवळील गांजेगाव येथील स्नेहा गोल्ड प्रोटीन उदयोग हा यवतमाळ जिल्हा व नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांन साठी वरदान ठरणार असुन शेतकरी बांधवांचे यामुळे जिवनमान उंचावणार आहे येत्या ऑक्टोबर, नोव्हेंबर २०२४ पर्यंत पूर्णतवास येऊन शेतकऱ्यांच्या सेवेत येत असलेल्या स्नेहा गोल्ड प्रोटीन प्राईव्हेट लिमिटेड या कंपनी मुळे संपुर्ण यवतमाळ,नांदेड, हिंगोली या जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना फायदा होणार आहे जवळपास ८५० टन प्रतिदिन सोयाबीन या कारखान्याला लागणार आहे,३ लाख टन सोयाबीन प्रति वर्ष स्टोरेज कॅपॅसिटी कंपनी करणार असुन त्यामुळे कुठल्याही शेतकऱ्यांचे सोयाबीन विक्री अभावी शिल्लक राहणार नसुन शेतकऱ्यांना चांगला भाव मिळणार आहे असे कंपनी चे प्रोजेक्ट प्रमुख गोवर्धन राव यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलतांना सांगितले ते पुढे म्हणाले की या कारखान्यात सोयाबीन पासुन आम्ही सोया केक तयार करत असुन हे खाद्य प्रामुख्याने कुक्कुट पालणासाठी उपयोगात येणार आहे आणि सोयाबीन चे बायप्रॉडक्ट म्हणुन येथे सोयाबीन तेला चे उत्पादन होणार आहे जवळपास १२५०० टन प्रमाणे ४ सेलिंग असे ५०००० टन तेलाचे स्टोरेज असणारे हे युनिट राहणार आहे शेतकऱ्यांच्या सोयाबीन मालाला चांगला भाव मिळणार आहे या मुळे शेतकरी बांधव यांचे जिवनमान उंचावणार आहे त्यांची आर्थिक सुबत्ता वाढणार असुन त्यामुळे सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रावर चांगले परिणाम दिसुन येणार आहे तालुक्यातील आसपास च्या बेरोजगार युवकांना याचा फायदा होईल आय टी आय झालेल्या, अभियंता झालेल्या टेक्निशियन यांना रोजगार मिळेल तसेच मार्केटिंग करीता, तसेच विविध पदावर स्थानिक तरुणांना रोजगाराची संधी मिळणार आहे, या शिवाय ऑफिस स्टाफ म्हणून १०० ते १५० युवक युवती यासाठी लागणार आहे कामगार म्हणुन ६०० ते ७०० लोकं कंपनी मध्ये लागणार असुन हे सर्व आम्ही स्थानिक लोकांमधून निवडणार असुन या मुळे तालुक्यातील व आजू बाजु च्या असंख्य लोकांना रोजगाराची संधी मिळणार आहे स्नेहा गोल्ड कंपनी ही सर्व शासकीय नियमानुसार व शासकीय धोरनानुसार चालणार असुन उमरखेड येथुन विज वितरण मंडळाचे स्वतंत्र फिडर येथे बसविण्यात येणार आहे तसेच पाण्याची स्वतंत्र पाईप लाईन येणार असुन कंपनी चे सर्व कामकाज हे नियमाचे काटेकोर पणे पालन करीत असुन ढाणकी येथील काही लोकांनी केलेले आमच्यावरील आरोप हे निराधार आहेत. कंपनी ने अजुन जवळपास २२ ते २५ एकर जमीन विकत घेतली असुन त्यामध्ये सौर ऊर्जा चा प्रकल्प टाकुन विद्युत निर्माण करण्याचा आमचा मानस आहे संपुर्ण ८० ते ८५ एकर च्या या भागात कंपनी चे कारखाना युनिट, कार्यालय, कर्मचारी यांचे निवासस्थान तसेच मोठ्याप्रमाणात झाडे लावण्यात येणार असुन या मुळे संपुर्ण भागाचा कायापलट होणार आहे