अवैध रेती उत्खनन करणाऱ्या चार वाहनावर डीवायएसपी पथकाची धडक कारवाई ( सोळा लाखाचा मुद्देमाल जप्त )
अवैध रेती उत्खनन करणाऱ्या चार वाहनावर डीवायएसपी पथकाची धडक कारवाई
( सोळा लाखाचा मुद्देमाल जप्त )
उमरखेड :-
पैनगंगा नदी पात्रातून अवैधरित्या उत्खनन करून अवैध वाहतूक करणाऱ्या मराठवाड्यातील चार ट्रॅक्टर वर उपविभागीय पोलीस अधिकारी पथकाने धडक कारवाई करून 3 ट्रॅक्टर 4 ट्रॉली सह 4 ब्रास रेती असा एकूण 16 लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे . धडक कारवाई दि 3 एप्रिल रोजी सकाळी 7 वाजता चे दरम्यान देवसरी शेत शिवारातील पैनगंगा नदीच्या पात्रात करण्यात आली .
सदर धडक कारवाईमुळे रेती माफिया मध्ये खळबळ उडाली असून प्रशासन निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याचा फायदा घेत अवैध रेती वाहतूक बिना बोभाट सुरू होती या कारवाईमुळे आळा बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे .
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दि 3 एप्रिल रोजी तालुक्यातील देवसरी पैनगंगा नदी पात्राच्या शिवारात चार वाहन अवैध उत्खनन करून वाहतूक करीत असताना निदर्शनास आले . सदर वाहनाची तपासणी केली असता प्रत्येकी वाहनात एक ब्रास रेती आढळून आले .चार वाहनापैकी एक ट्रॅक्टर चालक ट्रॉली सोडून ट्रॅक्टर घेऊन पसार झाला . पोलिसांनी ट्रॅक्टर क्रमांक एम एच 26 व्हि 7642 चालक ऋषिकेश गजानन शिंदे अंबाळा ता हदगाव , ट्रॅक्टर क्रमांक एम एच 26 बी एक्स 0426 चालक लक्ष्मण संभाजी भोयर रा हरडप ता हदगाव ,ट्रॅक्टर क्रमांक एम एच 26 व्हि 3928 चालक सचिन आनंदराव शेळके, रा हरडप ता हदगाव व ट्रॅक्टर घेऊन पसार झालेल्या ट्रॉली चे मालक सतीश वानखेडे रा धोत्रा ता हदगाव यांचे वर वाहतूक शाखेचे सपोनि रोहित बेंबरे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद करण्यात आला असून सोळा लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे .
सदर कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक शाखेचे सपोनि रोहित बेंबरे ,आरसीबी पथक प्रमुख दिलीप वाघमारे ,जमादार रुपेश चव्हाण, युनूस भातनासे ,अनिल पवार सह आरसीबी चे दहा ते बारा कर्मचारी यांनी पार पाडली .