सर्वधर्मीय सण आनंदात व शांततेत साजरे करा – ठाणेदार संजय सोळंके
सर्वधर्मीय सण आनंदात व शांततेत साजरे करा –
ठाणेदार संजय सोळंके
उमरखेड :-
एप्रिल महिन्यात सर्वधर्मीय सण मोठ्या प्रमाणात येत असून सोबतच आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहितेचे पालन करून नागरिकांनी सण आनंदात व शांततेत साजरे करा असे आवाहन ठाणेदार संजय सोळंके यांनी केले .
स्थानिक डॉ बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाच्या सभागृहात आयोजीत शांतता समितीच्या बैठकीत ते अध्यक्ष स्थानावरून बोलत होते .
यावेळी कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून नगरपरिषद मुख्याधिकारी महेशकुमार जामनोर, नायब तहसीलदार सुभाष पाईकराव, स.पो.नि निलेश सरदार मंचावर उपस्थित होते .
पुढे बोलताना ठाणेदार सोळंके नी सांगितले कि
तुम्ही माझे कान, नाक, डोळे व्हा व प्रशासनाला सहकार्य करा. असे आव्हानही यावेळी सोळंके यांनी करून
लोकसभा निवडणुकी दरम्यान धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमात कोणती फलके लावावी , धार्मिक कार्यक्रमात राजकीय प्रचार अथवा राजकीय झेंडा किंवा चिन्हाचा वापर करू नये तसेच लोकशाही जपण्याचा एक भाग म्हणजे मतदान करणे आहे. कोणाचेही बॅनर लावताना नगर परिषदेची परवानगी घ्यावी लागेल तसेच मागील अनेक वर्षापासून उमरखेड शहराला असंवेदनशीलतेचा लागलेला गालबोट पुसण्याकरिता नागरिकांनी भूतकाळ आपण बदलू शकत नाही तर भविष्यकाळ आपल्या हातात आहे, गाव शांत कसे ठेवायचे हे आपल्या येथील नागरिकांच्या हातात आहे असे ते म्हणाले .
सूत्रसंचालन प्रवीण सूर्यवंशी यांनी केले तर आभार प्रदर्शन पो. कॉ. संतोष राठोड यांनी केले . शांतता सभेला शहरातील शांतता कमिटीचे सदस्य पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
helloI like your writing very so much proportion we keep up a correspondence extra approximately your post on AOL I need an expert in this space to unravel my problem May be that is you Taking a look forward to see you