सिजर दरम्यान बाळंतनीचा मृत्यू , कुटुंबीयांनी ठिया देत पोलिसात दिली तक्रार (उपजिल्हा रुग्णालयात झाले होते सिजर ; पीडीतेचा नांदेड येथे मृत्यू ; डॉक्टरांच्या हलगर्जींचा कुटुंबीयांचा आरोप )

youtube

सिजर दरम्यान बाळंतनीचा मृत्यू , कुटुंबीयांनी ठिया देत पोलिसात दिली तक्रार

(उपजिल्हा रुग्णालयात झाले होते सिजर ; पीडीतेचा नांदेड येथे मृत्यू ; डॉक्टरांच्या हलगर्जींचा कुटुंबीयांचा आरोप )

उमरखेड :
येथील उपजिल्हा रुग्णालय येथे सिजर द्वारे प्रसुती झालेल्या बाळंतनीचा कर्तव्यावर असलेल्या डॉक्टर व स्टाफ यांच्या हलगर्जी व निष्काळजीपणा आणि चुकीच्या उपचार पद्धतीमुळे मृत्यू झाल्याचा आरोप पतीने करीत मृतदेह पोलीस स्टेशन येथे आणून ठिया देत तक्रार नोंदवली आहे . ही घटना आज संध्याकाळी 3 वाजेदरम्यान उघडकीस आली. त्यामुळे या घटनेने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

प्रतीक्षा अमोल कुकडे अं 24 रा हुडी ता पुसद असे मृत पावलेल्या बाळंतिणीचे नाव आहे.अमोल उत्तमराव कुकडे 28 रा हुडी ता पुसद असे फिर्यादी पतीचे नाव आहे . पुसद तालुक्यातील हुडी येथील प्रतीक्षा प्रसुतीसाठी कुपटी येथे आपल्या वडिलाच्या घरी आली होती. दरम्यान काल 6 जुलै रोजी सकाळी पोट दुखत असल्याने माहेरच्या लोकांनी येथील उपजिल्हा रुग्णालयात भरती केले होते. दरम्यान त्याच दिवशी दुपारी कर्तव्यावर असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या तपासणी अंति बाळंतनीचे सिजर करण्यात आले. प्रतीक्षाने एका कन्येला जन्म ही दिला .मात्र तिची तब्येत खालावत जात होती .रक्तस्त्राव थांबत नव्हता . त्यामुळे उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्यांनी बाळंतीण महिलेला पुन्हा एकदा ऑपरेशन थेटर मध्ये नेण्यात आले. परंतु सिजर वेळी चुकीच्या पद्धतीने टाके मारले असल्यानेच महिलेला रक्तस्त्राव होत होता . त्यामुळे सिजर खोलून पुन्हा सिजर करण्यात आले . व मृत प्रतीक्षा हिला ओव्हरडोज दिल्या गेल्यामुळे मृतक प्रतिक्षा हिचा रक्तदाब , हृदयाचे ठोके अनियंत्रित झाले . हे सर्व बाबी डॉक्टरांच्या लक्षात आल्याने डॉक्टरांनी सदर महिलेस नांदेड येथे रेफर केले. असा आरोप मृत बांळतीन प्रतीक्षा हिचा पती अमोल कुकडे यांनी पोलिसांना दिलेल्या अर्जात केला आहे .
दरम्यान नांदेड येथे उपचारासाठी ऍडमिट केलेल्या प्रतीक्षा आज 7 जुलैच्या सकाळी 7 च्या दरम्यान मृत पावल्याचे तेथील डॉक्टर यांनी सांगितले आहे.दरम्यान नांदेड येथे शवविच्छेदन करून प्रतीक्षा हिचा मृतदेह कुटुंबीयांनी पोलीस स्टेशन उमरखेड येथे आणला तेथे अर्धा तास ठिय्या देत पोलिसांना तक्रार दिली आहे.वृत्त लिहेपर्यंत सदर प्रकरणी फिर्याद दाखल झाली नव्हती.पुढील तपास उमरखेड पोलीस करीत आहेत.

चौकट

कुटुंबीयांचा पोलीस स्टेशन येथे ठिय्या

नांदेड येथून मृत बाळंतीण प्रतीक्षा हिला घेऊन आलेल्या कुटुंबीयांनी उमरखेड पोलीस स्टेशन येथे अर्धा तास ठिय्या देत तक्रार दाखल केली आहे . पोलिसांनी ही घटनेचे गांभीर्य ओळखून तक्रार घेत दोशीवर तपासाअंती कार्यवाही करण्याची ग्वाही दिली आहे .

Google Ad
Google Ad

4 thoughts on “सिजर दरम्यान बाळंतनीचा मृत्यू , कुटुंबीयांनी ठिया देत पोलिसात दिली तक्रार (उपजिल्हा रुग्णालयात झाले होते सिजर ; पीडीतेचा नांदेड येथे मृत्यू ; डॉक्टरांच्या हलगर्जींचा कुटुंबीयांचा आरोप )

  1. ข้อมูลเชิงลึกของคุณเกี่ยวกับหัวข้อนี้ช่างน่าสนใจ บทความนี้เป็นความสุขที่แท้จริงในการอ่าน

  2. I loved as much as you will receive carried out right here The sketch is tasteful your authored subject matter stylish nonetheless you command get got an edginess over that you wish be delivering the following unwell unquestionably come further formerly again as exactly the same nearly very often inside case you shield this hike

  3. I have been browsing online more than three hours today yet I never found any interesting article like yours It is pretty worth enough for me In my view if all website owners and bloggers made good content as you did the internet will be a lot more useful than ever before

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!