उमरखेड विडुळ रस्त्याचे निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या कंत्राटदारावर तत्काळता कारवाई करा.. राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे उप अभियंता यांना निवेदनातून मागणी

youtube

उमरखेड विडुळ रस्त्याचे निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या कंत्राटदारावर तत्काळता कारवाई करा..
राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे उप अभियंता यांना निवेदनातून मागणी

उमरखेड :-

मागील काही दिवसापासून उमरखेड ते विडुळ रस्त्याचे काम सुरू असून हे रस्त्याचे काम सतत काहीना काही वादात सापडलेले आहे आता तर या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याच्या अनेक तक्रारी समोर आलेले आहेत .
भर पावसाळ्यात डांबरीकरणाचे काम सुरू असून सदरील काम आठही दिवस झाले नाही तरी देखील या रस्त्याला मोठ्या प्रमाणात भेगा पडल्याचे व अनेक ठिकाणी रस्ता फुटल्याचे समोर आलेले आहे याच संदर्भात आज राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या वतीने उपविभागीय अभियंता उमरखेड यांना निवेदन देऊन संबंधित कंत्राटदारावर तात्काळ कारवाई करून रस्त्याचे काम तात्काळ थांबवण्याची मागणी करण्यात आली आहे..
उमरखेड रस्त्याला मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून कित्येक दिवसापासून हा रस्ता प्रलंबित होता..केवळ खड्डे बुजवण्याचे थातूरमातूर सोपस्कार करून सदरील रस्ता हा नेहमीच उपेक्षित राहिला होता मात्र काही दिवसापूर्वी हा रस्ता मंजूर झाला आणि या रस्त्याचे काम सुरू झाले.खरंतर हे काम उन्हाळ्यात होणे अपेक्षित असतानाही डांबरीकरनाचे काम असून पावसाळ्यात काम करण्यात आले त्यामुळे या कामावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले. त्यातही संबंधित कंत्राटदार हा निकृष्ट दर्जाचे काम करत असल्याचे समोर येत आहे.अनेक दिवसापासून रस्ता खोदून ठेवला त्या रस्त्यावर अनेक अपघात झाल्याच्या घटना देखील समोर आलेल्या आहेत मात्र सदरील काम हे निकृष्ट दर्जाचे होत असून केवळ आठ दिवसांमध्ये हा रस्ता खचला गेला व अनेक ठिकाणी रस्त्याला भेगा पडल्याचे समोर आले असून यासंदर्भात विभागाची व कंत्राटदाराची मिली बघत असल्याचा आरोप होत आहे त्यामुळे संबंधित प्रकार कंत्राटदारावर तात्काळ कारवाई करावी व निकृष्ट दर्जाचे होत असलेले काम तात्काळ थांबवण्यात यावे अशी मागणी विविध स्तरातून होत आहे तरी या संदर्भात उपविभागीय अभियंता यांना निवेदनातून केली आहे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस चे तालुका अध्यक्ष स्वप्निल कनवाळे,युवा नेते रहेमत जहागिरदार, सय्यद मुसा, युवक चे तालुका अध्यक्ष निवृत्ती वानखेडे, शहर अध्यक्ष नदीम पठाण, उपाध्यक्ष रोहित हेलगंड,कार्यध्यक्ष असलम शेख,अबुझर बेग,शेख दानिश, अकीब खान,सरफराज, मुस्सविर इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते…!

उमरखेड तालुक्याचा सधन भाग असलेला मतखंड म्हणून ओळखला जातो मात्र मतखंडातील जनता नेहमीच पक्क्या आणि चांगल्या दर्जाच्या रस्त्यापासून वर्षानुवर्षे उपेक्षित राहिली आहे त्यातही आता रस्ता मंजूर झाला तर त्याला निकृष्ट दर्जाचे ग्रहण लागले असून सदरील काम हे तत्काळ थांबवावे व कंत्राट दरावर कारवाई करून चांगल्या दर्जाचे काम करून घ्यावे अन्यथा रस्त्याचे काम आम्ही थांबवू- स्वप्निल कनवाळे पाटील तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) उमरखेड]

Google Ad
Google Ad

7 thoughts on “उमरखेड विडुळ रस्त्याचे निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या कंत्राटदारावर तत्काळता कारवाई करा.. राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे उप अभियंता यांना निवेदनातून मागणी

  1. นี่คืองานข่าวที่ยอดเยี่ยมที่สุด บทความของคุณให้ข้อมูล มีความสมดุล และอ่านได้อย่างเพลิดเพลิน

  2. Wow amazing blog layout How long have you been blogging for you made blogging look easy The overall look of your web site is magnificent as well as the content

  3. Fantastic beat I would like to apprentice while you amend your web site how could i subscribe for a blog site The account helped me a acceptable deal I had been a little bit acquainted of this your broadcast offered bright clear concept

  4. Somebody essentially help to make significantly articles Id state This is the first time I frequented your web page and up to now I surprised with the research you made to make this actual post incredible Fantastic job

  5. Somebody essentially lend a hand to make significantly articles Id state That is the very first time I frequented your website page and up to now I surprised with the research you made to make this actual submit amazing Wonderful task

  6. Hi my loved one I wish to say that this post is amazing nice written and include approximately all vital infos Id like to peer more posts like this

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!