पैनगंगा नदीत वाहून गेला ४५ वर्षीय युवक दोन दिवसाच्या अथक प्रयत्नाने एनडीआरएफ पथकाला यश ! प्रतिनिधी

youtube

पैनगंगा नदीत वाहून गेला ४५ वर्षीय युवक
दोन दिवसाच्या अथक प्रयत्नाने एनडीआरएफ पथकाला यश !

प्रतिनिधी
उमरखेड :

दोन दिवसाअगोदर गावाशेजारील बंधाऱ्याजवळ फिरण्यासाठी गेलेल्या ४५ वर्षीय युवकाचा पाय घसरून बंधाऱ्यावरून तोल जावून पैनगंगा नदीत वाहून गेल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना आज उघडकीस आली आहे .

प्राप्त माहितीनुसार

संदीप प्रतापराव देवसरकर (४५ ) असे मृतकाचे नाव असुन तो देवसरी गावाजवळील पैनगंगा नदीवरील बंधाऱ्यावर मागील दोन दिवसाअगोदर सायंकाळी ५ वाजता फिरण्यासाठी गेला होता अचानक त्याचा पाय घसरल्याने तोल गेला व तो बंधार्यात कोसळला . पैनगंगा नदिवर इसापूर धरणावर गेट उघडल्याने मोठया प्रमाणात पाण्याचा प्रवाह सुरु असल्याने संदीप हा नदिच्या पात्रात वाहून गेला . याची माहीती देवसरीचे पोलिस पाटील देविदास पंडितराव देवसरकर यांनी उमरखेड पोलिसांना दिल्याने मागील दोन दिवसापासून संदीपचा शोध पोलिस घेत होते मात्र त्यांना यश आले नाही म्हणून प्रशासनाने यवतमाळ येथील एनडीआरएफच्या पथकालाआज पाचारण केले असता वाहून गेलेला संदीप हा चातारी येथील नदीपात्रातील बंधाऱ्यात एनडीआरएफच्या पथकाला मृत अवस्थेत सापडला . संदीपच्या मृत्यूने देवसरी गावावर शोककळा पसरली असून संदीपवर शवविच्छेदन हे जागेवरच करण्यात आले आहे . संदीपचे शव शोधण्यासाठी मागील दोन दिवसापासून ठाणेदार संजय सोळंके यांच्या मार्गदर्शनात एपिआय सारीका राऊत, पोहे . प्रमेश दवडगावकर, पो .ना . रवि चव्हाण, पो.कॉ . प्रशांत कदम, संदीप जाधव यांनी प्रयत्न केले .

Google Ad
Google Ad

1 thought on “पैनगंगा नदीत वाहून गेला ४५ वर्षीय युवक दोन दिवसाच्या अथक प्रयत्नाने एनडीआरएफ पथकाला यश ! प्रतिनिधी

  1. Hi there too every body, it’s myy ffirst ggo too see of tthis website; thos webpage conssts oof awesaome aand really goo informmation designed ffor readers.

    Feeel ree to surf tto myy ite … roloxxx.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!