कायदा – सुव्यवस्था मोडकळीस आननाऱ्यां ची गय केल्या जाणार नाही -पियुष जगताप उपपोलीस अधिक्षक गणपती विसर्जना दरम्यान घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली माहिती 

youtube

कायदा – सुव्यवस्था मोडकळीस आननाऱ्यां ची गय केल्या जाणार नाही -पियुष जगताप उपपोलीस अधिक्षक
गणपती विसर्जना दरम्यान घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली माहिती 

उमरखेड – सविता चंद्रे
मागील दोन दिवसा पासुन समाज माध्यमावर चुकीच्या पद्धतीने फिरत असलेल्या चित्रफीत आणि अफवाचे संदेश पसरविल्या जात असल्याने निष्कारण पणे नागरिकांचा मनस्ताप वाढुन अफवा पसरविण्याचा प्रकार वाढविल्या जात असल्याने याचा परिणाम सामाजिक स्वास्थ बिघडण्या मध्ये महत्वपूर्ण ठरत आहे समस्त नागरिकांनी अश्या प्रकारच्या चुकीच्या अफवावर मुळीच विश्वास ठेवु नये , उमरखेड शहरामध्ये गणपती स्थापना करणाऱ्या मंडळाची संख्या सर्वाधिक होती येथील गणेश विसर्जन मंडळाच्या पदाधिकारी व संलग्न असलेल्या कार्यकर्त्यांनी अतिशय शांतता पुर्ण वातावरणा मध्ये शहरात विसर्जन पार पाडले परंतु काही विघ्नसंतोषी लोकांनी आनंदी वातावरणाला दुषित करण्यासाठी समाज माध्यमावर तथ्यहीन संदेश प्रसारित करून सामाजिक स्वास्थ बिघडवण्याचा प्रयत्न करू पाहत आहेत या सर्व बाबींवर पोलीस प्रशासनाचे कटाक्षाने लक्ष असुन असे प्रयत्न करू पाहणाऱ्या विरुद्ध लवकरच कार्यवाही केली जाईल अश्या कारवाया करीत असतांना त्या पद्धतीची वास्तव पुष्टी मिळाल्यास अश्या समाजकंटकाची गय केल्या जाणार नाही आणि निरपराध व्यक्ती वर कार्यवाही होणार नाही याची काळजी पोलीस प्रशासन घेत आहे असे जिल्हा पोलीस उपअधीक्षक पियुष जगताप यांनी पत्र परिषद मध्ये माहिती देतांना सांगीतले पत्र परिषदचे आयोजन गुरुवार १९ सप्टेंबर रोजी पोलीस स्टेशन उमरखेड मध्ये घेण्यात आली होती.
ढाणकी येथे १७ सप्टेंबर रोजी इतर गणपती विसर्जना बरोबर च सार्वजनिक गणेश मंडळाची मिरवणूक निघाली होती त्या दिवशी रात्री काही समाजकंटकाकडून विटंबना करून मिरवणुकीला गालबोट लावण्याचा प्रयत्न झाला असतांना या घटनेत पोलीस प्रशासनाने घटनेचे गांभीर्य ओळखत अफवावर विश्वास न ठेवता समाज स्वास्थ बिघडवीणाऱ्या समाजकंटकावर तात्काळ गुन्हे दाखल करून कायदा व सुव्यवस्था बिघडविणाऱ्या विरुद्ध गुन्हे दाखल केले पैकी यातील ९ जणांना अटकही केली आणि त्या ठिकाणी शांतता कायम असुन बाजार पेठ सुरळीत सुरु आहे सलग दुसऱ्या दिवशी बुधवारी १८ सप्टेंबर रोजी ग्रामीण भागातील गणेश विसर्जन सुरु असतांना विडुळ येथे रात्री ८ च्या दरम्यान काही समाजकंटका कडुन मिरवणुकीवर मार्गक्रमण करत असतांना दगडफेक करून शांतता भंग करण्याचा प्रयत्न झाला त्या समाजकंटकांना शोधून काढुन त्या घटनेत निश्चित पणे ते सामील होते किंवा नाही याची खातरजमा करीत आमचे अधिकारी व कर्मचारी सखोल पणे करत आहेत तेव्हा काहीजनांना चौकशी साठी ताब्यात घेतले होते हे सर्वजण निरपराध आहे अश्या वर कार्यवाही होऊ नये म्हणुन महिला व पुरुष नातेवाईक समर्थकांनी उमरखेड पोलीस स्टेशन मध्ये काही काळ ठिय्या दिला होता.
मागील काही दिवसापासुन गणपती उत्सव काळा मध्ये ढाणकी शहर सलंग्न परराज्यातील सीमावर्ती भागात असल्याने व उमरखेड शहरात बाहेरील समाजकंटकांचा शिरकाव होत आहे या सर्व प्रकारावर पोलीस प्रशासन करडी नजर ठेवुन आहे पोलिसांची भुमिका कोणत्याही कार्यवाही मध्ये सकारात्मक पद्धतीचीच राहिली आहे त्यामुळे कोणी शंका बाळगन्याचे मुळीच कारण नाही.
अज्ञात इसमाने उमरखेड नांदेड रस्त्यालगत असलेल्या संतोष बाबुराव पेन्शनवार यांच्या मालकीच्या दुकानाला रात्री १०. ३० च्या दरम्यान आग लावुन २ लाखाचे साहित्य जाळून नुकसान झाले आहे या घटनेच्या तपासात सी सी टीव्ही च्या माध्यमातून सर्व तांत्रिक बाबींचा तपास केल्या जात आहे लवकरच या घटनेती ल गुन्हेगारा पर्यन्त पोहचू असा आत्मविश्वास घटनेच्या अनुषंगाने अधिकारी जगताप यांनी विश्वास दर्शविला.
मोहम्मद पैगंबर यांच्या जयंती निमित्याने समिती कडुन शहरात गुरुवार रोजी मिरवणूक निघणार होती गणेश विसर्जनाचा ताण तणाव पाहता समितीच्या पदाधिकारी यांच्या समवेत समन्वय साधत होऊ घातलेली मिरवणूक २८ सप्टेंबर रोजी घेण्याचे सुचविले असता समितीने सकारात्मक असा प्रतिसाद दर्शवीला आणि ही मिरवणूक त्या दिवशी होणार आहे असे या वेळी माहिती देतांना सांगितले या वेळी ठाणेदार संजय सोळंखे हे हजर होते.

Google Ad
Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!