वसंतच्या अवसायकानी कारखाना ताब्यात घेउन नवीन भाडे प्रक्रीया राबवावी ऊस उत्पादक सभासद संघाची पत्र परीषदेत मागणी

youtube

वसंतच्या अवसायकानी कारखाना ताब्यात घेउन नवीन भाडे प्रक्रीया राबवावी
ऊस उत्पादक सभासद संघाची पत्र परीषदेत मागणी

प्रतीनीधी /८ ऑक्टोबर
उमरखेड :
वसंत सहकारी साखर कारखाना भैरवनाथ शुगर वर्कस यांच्या कडूण यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्यात झालेल्या त्रिपक्षीय करारानुसार कारखाना चालविण्यास असमर्थ असल्याने भाडेपट्टा रद्द करण्या संदर्भात प्रादेशीक सहसंचालक साखर विभाग अमरावती यांच्या कडे १९ जुलै रोजी ऊस उत्पादक सभासद संघ यांच्या कडुण कळवीले होते कारखाना गळीत हंगाम सन २०२२ – २३ मध्ये १३ हजार मेट्रीक टन व सन २०२३ – २ ४ मध्ये ७२ हजार मेट्रीक टन एवढे अल्प गाळप केले आहे त्यामुळे वसंतच्या कार्यक्षेत्रातील ऊसउत्पादक शेतकरी सभासद, कामगारा, मजुर ऊस तोड वाहतुकदार यांचे खुपमोठे नुकसाण झाले आहे तेव्हा येथील शेतकर्याना ऊस पाठवीण्या साठी १० ते २० हजार रुपये प्रती एकरला असा अधीक खर्च करावा लागला ऊसाचे गाळप वेळेत झाले नसल्याने वजनात देखील घट झाली होती कारखाण्यावर अवसायक कार्यरत नसल्याने या बाबतीचे गांभीर्य घेउण अधीक . वेळ न लावता कारखाना व इतर मालमत्ता ताब्यात घेउण नवीन भाडे प्रक्रिया राबवावी शेतकर्याची नुकसान भरपाई भैरवनाथ शुगर वर्कस कडुन करुण घ्यावी वसुली होत नसल्यास भैरवनाथ शुगरच्या मुळ युनीटवर जप्तीची कार्यवाही करावी असी माहीती ८ ऑक्टोंबर रोजी आयोजीत पत्रपरीषदे मध्ये ऊस उत्पादक सभासद संघाचे अध्यक्ष डॉ. गणेश घोडेकर याणी माहीती देत म्हटले आहे.

वसंतच्या मालकीचे रोलर विना परवानगी ने कारखाण्या बाहेर जात होते या बाबतीत ऊस उत्पादक सभासद संघाचे अध्यक्ष याना माहीती मिळताच त्याणी हे रोलर वाहणासह अडवीले होते . या बाबीचा सातत्याने पाठपुरावा केल्या संदर्भात वचपा म्हणुन भैरवनाथ शुगर कडूण डॉ. गणेश घोडेकर व डॉ . प्रदीप कदम या दोघा विरुद्ध रोलरची गाडी अडविल्या बाबत पोलीसात तक्रार केली होती लगेच दोन दिवसाणी फक्त डॉ. घोडेकर विरुद्ध पैस्याची मागणी केल्या बाबत पुन्हा खोटी तक्रार दाखल केली असल्याचा आरोप ऊस उत्पादक सभासद संघाने केला भैरवनाथ शुगरचा कारभार पूर्णतः ढेपाळला असल्याचे या वेळी डॉ. घोडेकर म्हणाले
. ऊस उत्पादक सभासद संघाने घेतलेल्या पत्र परीषदेला डॉ. गणेश घोडेकर, संतोष आखरे, साहेबराव कदम, डॉ. कोंडबा शिन्दे, संभाजी यादवकुळे, डॉ. प्रदीप कदम हे प्रमुखजन उपस्थीत होते.

Google Ad
Google Ad

7 thoughts on “वसंतच्या अवसायकानी कारखाना ताब्यात घेउन नवीन भाडे प्रक्रीया राबवावी ऊस उत्पादक सभासद संघाची पत्र परीषदेत मागणी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!