राजस्थानी मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटी प्रकरणात सल्लागार मंडळाला जाणीवपूर्वक डावलले प्रहार जनशक्ती पक्षाचा पत्रकार परिषदेमधून पोलीस प्रशासनावर आरोप

youtube

राजस्थानी मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटी प्रकरणात सल्लागार मंडळाला जाणीवपूर्वक डावलले

प्रहार जनशक्ती पक्षाचा पत्रकार परिषदेमधून पोलीस प्रशासनावर आरोप

उमरखेड :- येथील ठेवीदारांना लुबाडून राजस्थानी मल्टीस्टेट को-ऑपरेटिव क्रेडिट सोसायटी ने कोट्यावधी रुपयाचा गंडा घालून पोबारा केला. या प्रकरणात पोलिसांनी 10 ऑक्टोबर रोजी संचालक मंडळावर गुन्हे दाखल केले परंतु यामधून स्थानिक सल्लागार मंडळ, व्यवस्थापक व कर्मचारी यांच्यावर जाणीवपूर्वक गुन्हे दाखल केले नसल्याचा आरोप प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आज दिनांक 15 ऑक्टोबर रोजी विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेतून केला.
शहरातील शेतकरी ,मजूर, मध्यमवर्गीय ,व्यापारी , महिला व नागरिकांनी एकेक पैसा जमा करून आपली जमापुंजी राजस्थानी मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी च्या उमरखेड शाखेमध्ये जमा केली. काही जणांनी मुदत ठेवी दिल्या. भरघोस व्याजाचे आमिष दाखवून त्यांच्याकडून सोसायटीने रक्कम जमा केली. या प्रकरणात बँक व्यवस्थापक, कर्मचारी व स्थानिक सल्लागार मंडळ यांनी सुद्धा गुंतवणूकदारांना बँकेत आपली गुंतवणूक रक्कम जमा करण्यासाठी वारंवार तगादा देखील लावला. त्यानुसार नागरिकांनी आपली जमापुजी बँकेत जमा केली. मुदत संपल्यानंतर देखील मुदती ठेवीची रक्कम सोसायटीकडून खातेदारांना मिळाली नाही. बँकेने अखेर जवळपास दहा ते पंधरा कोटी रुपये जमा करून उमरखेड शहरातून पोबारा केला. यामुळे ठेवीदारांनी पोलिसात धाव घेतली. पोलिसांनी देखील आपण चौकशी करू असे करत चाल ढकल केली व एफ आय आर दाखल करण्याचे निव्वळ आश्वासन दिले. यामध्ये सत्ताधाऱ्यांचा दबाव असून जे काही लुटारू आहेत त्यांच्यावर तेव्हाच कार्यवाही करून पोलिसांनी न्याय दिला नाही. प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने वारंवार सदर रक्कम मिळण्यासाठी पोलीस अधीक्षक पवन बनसोड ,पोलीस उपाधीक्षक पियुष जगताप यांना भेटून सुद्धा एफ आय आर दाखल करण्याची विनंती केली असल्याची माहिती प्रहार जनशक्ती पक्षाचे राहुल मोहितवार यांनी पत्रकार परिषदेतून दिली.
पुढे बोलताना ते म्हणाले की, ठेवीदारांच्या ठेवी परत मिळण्यासाठी आम्ही दोन दिवसाचे आमरण सुद्धा केले होते . यासोबतच बँकेच्या ठेवीदारांनी व खातेदारांनी स्थानिक सल्लागार यांच्यावर गुन्हे दाखल करण्यासंदर्भात तक्रारी पोलिसात दाखल केल्या होत्या. पण स्थानिक सल्लागार यांच्यावर गुन्हे दाखल का केले नाही ? पोलीस प्रशासन स्थानिक सत्ताधाऱ्यांच्या दबावात येऊन जाणीवपूर्वक त्यांना वाचविण्याचा प्रयत्न करत आहे. असा आरोपही यावेळी त्यांनी केला.
यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे बालाजी माने ,श्याम चेके ,विवेक जळके ,अभिजीत गंदेवार, नारायण भवर यांच्यासह बँकेत ठेवी असणारे खातेदार उपस्थित होते

चौकट…….

चौकशी मधून सर्व बाबी स्पष्ट होतील – ठाणेदार शंकर पांचाळ

राजस्थानी मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी मधील प्रकरणात गुन्हा दाखल झाला असून सदर प्रकरणाची चौकशी सुरू आहे. चौकशी मधून सर्व बाबी समोर येतीलच. यानुसार जे काही आरोपी असतील त्यांना कोणालाही सोडणार नाही व निरापराधाचा बळी जाऊ देणार नाही अशी प्रतिक्रिया प्रस्तुत प्रतिनिधी सोबत बोलताना पोलीस निरीक्षक शंकर पांचाळ यांनी दिली.

Google Ad
Google Ad

1 thought on “राजस्थानी मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटी प्रकरणात सल्लागार मंडळाला जाणीवपूर्वक डावलले प्रहार जनशक्ती पक्षाचा पत्रकार परिषदेमधून पोलीस प्रशासनावर आरोप

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!