उमरखेड शहरातील एका सराईत गुन्हेगारावर एम पी डी एफ अंतर्गत कार्यवाही ( वाशिम कारागृहात एक वर्षाकरिता स्थानबद्ध ) पत्रकार परिषदेत माहिती
उमरखेड शहरातील एका सराईत गुन्हेगारावर एम पी डी एफ अंतर्गत कार्यवाही
( वाशिम कारागृहात एक वर्षाकरिता स्थानबद्ध )
उमरखेड :- सहा वर्षात अनेक गंभीर गुन्हे दाखल असलेल्या शहरातील इंदिरा गांधी वार्डातील अक्षय दिगांबर गायकवाड याच्यावर स्थानबद्धतेचे आदेश जिल्हाधिकारी मी निर्गमित केल्याने या फरार आरोपीस पुणे येथून अटक करून न्यायालयात हजर केले असता त्याला वाशिम येथील जिल्हा कारागृहात न्यायालयीन कोठडी एक वर्षाकरिता स्थानबद्ध करण्यात आल्याची माहिती उमरखेड पोलीस स्टेशनचे ठाणेदार शंकर पांचाळ यांनी पत्रकार परिषदेत दिली . पोलिसांनी एनपीडीए अंतर्गत करण्यात आलेल्या कार्यवाहीने पोलिसांनी कंबर कसली असून गुन्हेगारांचे धाबे दनानले आहे .
शहरातील इंदिरा गांधी वार्डातील अक्षय दिगंबर गायकवाड व 25 याचेवर अपहरण करून खंडणी मागून जबरी चोरी करणे, स्त्रीचा विनयभंग करून मारहाण करणे व शिवीगाळ करून धमक्या देणे, आडवणुक करून मारहाण करणे ,गैर कायद्याची मंडळी जमवून आता प्राण घातक शस्त्र घेऊन गंभीर दुखापत करून संपत्तीचे नुकसान करणे, अवैधरीत्या शस्त्र बाळगून दहशत निर्माण करणे अशा विविध स्वरूपाचे गंभीर गुन्हे दाखल असल्याने उमरखेड पोलीस स्टेशनच्या ठाणेदारांनी एम पी डी ए कायद्याने प्रस्ताव करून उपविभागीय पोलीस अधिकारी व ठाणेदार यांनी जिल्हा दंडाधिकारी यवतमाळ यांचेकडे सादर केला होता या प्रस्तावास जिल्हा दंडाधिकारी यांनी मान्यता देऊन 18 नोव्हेंबर रोजी स्थानबद्धतेचे आदेश निर्गमित केल्याने त्याचेवर असलेल्या गुन्हयामध्ये अक्षय गायकवाड यास पुणे येथून पीएसआय सागर इंगळे यांनी अटक करून न्यायालयात हजर केले असता त्यास एक वर्षासाठी जेलमध्ये टाकण्यात आले .
सदर कार्यवाही जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता , अप्पर पोलीस अधीक्षक जगताप उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड ,स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ चे पोलीस निरीक्षक ज्ञानोबा देवकते , सपोनी धनराज हाके व ठाणेदार शंकर पांचाळ यांनी यशस्वीपणे पार पाडली .