youtube

महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृतीदिना निमित्त

सत्यशोधक भाऊसाहेब माने समाज भूषण पुरस्कार जाहीर

उमरखेड :
तालुक्यात आपापल्या कार्यक्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांना दरवर्षी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृतीदिनानिमित्त सत्यशोधक भाऊसाहेब माने गौरव कृती समितीद्वारा आयोजित सत्यशोधक भाऊसाहेब माने समाजभूषण पुरस्कार जाहीर केल्या जातो . तालुक्यातील विविध क्षेत्रातील नाविन्यपूर्ण कामगिरी करणाऱ्यांना करणाऱ्या 9 जणांना दि . 28 नोव्हेंबर रोजी येथील जिजाऊ भवन येथे पुरस्कार वितरण होणार आहे .
या कार्यक्रमाचे उद्घाटक नवनिर्वाचित आमदार किसनराव वानखेडे तर अध्यक्षस्थानी कृषी महाविद्यालयाचे चेअरमन डॉ. विजयराव माने हे राहणार आहेत .
यामध्ये स्वर्गीय जेठमलजी माहेश्वरी व स्वर्गीया बंकटलाल भुतडा यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार म्हणून निळकंठ धोबे यांना तर स्वर्गीय नारायणराव शिलार व स्वर्गीय नारायण वानखेडे यांच्या स्मृति प्रित्यर्थ उत्कृष्ठ शैक्षणिक प्रशासनाबद्दल पं. स चे विद्यमान गटशिक्षणाधिकारी सतीश दर्शनवाड यांना ,स्वर्गीय रामचंद्र शिंगणकर व मरहुम हाजी अमानुल्ला जागीरदार यांच्या स्मृतिप्रित्यर्थ महिला सशक्तिकरणाच्या उत्कृष्ठ कार्याबद्दल माधुरी दळवी यांना, स्वर्गीय वामनराव उत्तरवार व स्व . गुलाबसिंग ठाकूर यांच्या स्मृतिपित्यर्थ दिव्यांग उद्योजक आनंद पतंगे यांना ,स्वर्गीय सखाराम नरवाडे गुरुजी व स्वर्गीय सखाराम मुडे गुरुजी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ
सामाजिक क्षेत्रातील आदर्श बहुउद्देशीय संस्था उमरखेड यांना, स्वर्गीय भाई केशवराव देवसरकर व स्वर्गीय परसराम पिलवंड यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सामाजिक वनीकरण अभियान राबविणारे अशोक शिरफुले यांना स्वर्गीय विठ्ठलराव देशमुख सवनेकर व स्वर्गीय देवराव पाटील चोंढीकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आदर्श शिक्षक म्हणून प्रल्हाद मिराशे यांना, कृ रा . देशपांडे गुरुजी व स्वर्गीय भास्करअण्णा गोविंदवार यांच्या स्मृती प्रित्यर्थ साहित्यिक पुरस्कार म्हणून प्राध्यापक अभय जोशी तर स्वर्गीय गुणवंतराव देशमुख व पंजाबराव भाऊसाहेब माने यांच्या स्मृति प्रित्यर्थ कृषी क्षेत्रात उत्कृष्ठ कार्या बाबत म्हणून सोमनाथ जाधव या 9 पुरस्कारार्थींना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे .
या कार्यक्रम सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहुन कार्यक्रमाची शोभा वाढवावी , असे आवाहन आयोजन समितीचे अध्यक्ष प्रविण सुर्यवंशी , उपाध्यक्ष अविनाश पाटील चंद्रवंशी , सचिव बालाजी चं वानखेडे यांनी केले आहे .

Google Ad
Google Ad

4 thoughts on “

  1. BWER Company is Iraq’s leading supplier of advanced weighbridge systems, offering reliable, accurate, and durable solutions for industrial and commercial needs, designed to handle heavy-duty weighing applications across various sectors.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!